“बिपाशाचा नवरा अजूनही मला..”; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून एक्स बॉयफ्रेंडबद्दल भावना व्यक्त

| Updated on: Apr 01, 2025 | 4:02 PM

अभिनेत्री बरखा बिश्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. बरखाचा एक्स बॉयफ्रेंड करण सिंह ग्रोवर हा आता अभिनेत्री बिपाशा बासूचा पती आहे.

बिपाशाचा नवरा अजूनही मला..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून एक्स बॉयफ्रेंडबद्दल भावना व्यक्त
Barkha Bisht and Bipasha Basu and Karan Singh Grover
Image Credit source: Instagram
Follow us on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री बरखा बिष्त नुकतीच तिच्या व्यक्तीगत आयुष्याविषयी व्यक्त झाली. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सिद्धार्थ कन्ननसोबत एका मुलाखतीमध्ये बरखा तिचं व्यक्तीगत आयुष्य, प्रेमसंबंध या विषयावर मोकळेपणाने बोलली. बरखा तिचा पूर्व पती इंद्रनील गुप्ताबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. इंद्रनील माझी फसवणूक करत होता, असं तिने सांगितलं. त्याशिवाय करण सिंह ग्रोव्हरसोबतच्या अफेअरबद्दलही ती व्यक्त झाली. 2004 साली आलेल्या ‘कितनी मस्त हैं जिंदगी’ मालिकेत बरखा आणि करण यांनी एकत्र काम केलं होतं. दोन वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते, तो अनुभव आणि त्यानंतर दोघांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलला? त्याबद्दल बरखाने सांगितलं.

“आम्ही दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. करणमध्ये मूळातच दयाळूपणाचा गुण होता. त्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाली. कारण मुंबईत सहसा इतक्या दयाळूवृत्तीची माणसं मिळत नाहीत. त्यामुळे जेव्हा कधी मला दयाळूवृत्ती माणसं दिसतात, मी त्यांच्याकडे आकर्षित होते” असं बरखा म्हणाली. “करण दिसायला खूप सुंदर होता. त्याचे सिक्स पॅक होते. मी त्यावेळी 23 वर्षांची होते. पुढे जाऊन आमचा दृष्टीकोन बदलत गेला. मुंबईतील माझा तो पहिला ब्रेक-अप होता” असं बरखाने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता”

“आमच्यात काही चुकीच घडलं नाही. आयुष्याबद्दलचा आमचा दृष्टीकोन, विचार बदलत गेले. तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. हा दोन वर्षाचा फरक आमच्या नात्यात दिसू लागला. आजही मला तो आवडतो, तो जिथे कुठे असेल, त्याला माझ्याकडून शुभेच्छा” अशा शब्दांत बरखाने करणसिंह ग्रोव्हरबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

“मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की..”

पूर्व पती इंद्रनील सेनगुप्ताने केलेल्या फसवणुकीबद्दलही बरखा मोकळेपणाने बोलली. “माझी फसवणूक झाली, तर मी नातं तोडायला मागेपुढे पाहणार नाही, असं बोलणाऱ्या महिलांपैकी मी एक होते. पण जेव्हा तुमच्याबाबतीत असं होतं, तेव्हा असं करण्यापेक्षा बोलणं खूप सोपं होतं, हे तुमच्या लक्षात येतं. मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की, मी इंद्रनीलला माफ केलं असतं. मी दोन वर्ष माझं लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. पण इंद्रनीलने त्याचा निर्णय घेतला, तो आता त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. हे लग्न का मोडलं त्याची तो तुम्हाला 100 कारणं देऊ शकतो” असं बरखा बिष्त म्हणाली.