सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत. यांचा हा विवाह 1954 च्या विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणीकृत विवाह असणार आहे. पण तुम्हाला माहितीये का की याआधीही अनेक स्टार्सनी कोर्ट मॅरेज केले आहेत. 2012 मध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी कोर्ट मॅरेज केले होते. लग्नानंतर त्यांनी रिसेप्शनही दिले. या जोडप्याला दोन मुलेही आहेत.
‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांचं देखील 23 नोव्हेंबर 2017 रोजी कोर्ट मॅरेज झाले आहे. कोर्ट मॅरेजनंतर या जोडप्याने कुटुंब आणि मित्रांसोबत सेलिब्रेशन केले होते.
स्वरा भास्करने 16 फेब्रुवारी 2023 रोजी समाजवादी पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
आमिर खानची मुलगी आयरा खानने 3 जानेवारी 2024 रोजी प्रियकर आणि फिटनेस कोच नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज केले होते. नंतर या जोडप्याने उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आणि मुंबईत रिसेप्शन पार पडले.
आमिर खानने रीना दत्तासोबत कोर्ट मॅरेजही केले होते. रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याचा खुलासा केला होता.
जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचाल यांनी अमेरिकेत कोर्ट मॅरेज केल्यानंतर पार्टी दिली होती. ही माहिती अभिनेत्याच्या वडिलांनी दिली आहे.