भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा सध्या तूफान चर्चेत आहे. हार्दिक पांड्याच्या आयुष्यात मोठे वादळ आलंय. एकीकडे आयपीएलमधून त्याची टीमबाहेर पडलीये तर दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्यात देखील सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे सांगितले जातंय. रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्यामधील वाद वाढलाय. हेच नाही हे दोघे विभक्त झाल्याचेही सांगितले जातंय. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा एक मुलगा देखील आहे. हार्दिक पांड्या हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. मात्र, त्याच्या संपत्तीमधून फार काही हिस्सा हा नताशा हिला मिळणार नाहीये.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाल्यापासून हार्दिक पांड्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या याच्याकडून मोठा खुलासा केला जातोय. हेच नाही तर हार्दिक पांड्या या व्हिडीओमध्ये त्याच्या संपत्तीबद्दल थेट बोलताना दिसतोय. ज्याची आता चर्चा होतंय.
हार्दिक पांड्या याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका मुलाखतीमधील आहे. हार्दिक पांड्या हा स्पष्ट करतो की, माझी 50 टक्केच संपत्ती ही माझ्या नावावर आहे. बाकी 50 टक्के आई, वडील आणि भावाच्या नावावर आहे. हेच नाही तर घर, गाड्या हे सर्व त्याच्या कुटुंबियांच्याच नावावर आहेत. आईचा त्याच्या संपत्तीमध्ये मोठा वाटा आहे.
Most of Hardik Pandya's property is in his mother's name.
Gujarati Brain For a Reason #HardikPandya pic.twitter.com/iPV7W0Nypj
— Rajasthani Tau Ji (@Rajasthanii_Tau) May 25, 2024
या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या स्पष्ट म्हणताना दिसतोय की, मी जे बोलत आहे, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण मी माझ्या नावावर काहीही घेतले नाहीये. मला माझ्या 50 टक्क्यांपैकी कोणालाही काहीही द्यायचे नाहीये, असेही सांगताना हार्दिक पांड्या हा दिसतोय. आता हार्दिक पांड्या याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. तसा हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ जुना आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. हेच नाही तर दुसऱ्यांदा यांनी लग्न केले. हार्दिक पांड्या याच्यासोबत डेट करण्याच्या अगोदर एका बड्या अभिनेत्याला नताशा हिने डेट केले. नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आता हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा हा होऊ शकतो.