जवळपास दोन वर्षांनंतर धुळवडीचा आनंद सर्वांना लुटता येणार आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे धुळवड नेहमीसारखी साजरी करता आली नाही. मात्र यंदाच्या वर्षी रंगांची जोरदार उधळण होणार आहे. गाण्यांशिवाय (Holi Songs)धुळवडीचा आनंद अपूर्ण आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये होळी, धुळवडीची धमाल दाखवली गेली आहे. त्यात अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ या गाण्यासह ‘होली के दिन दिल खिल जाते है’, ‘आज ना छोडेंगे बस हमजोली खेलेंगे हम होली’ यांसारखी गाणी ऐकायला मिळतात. होळी, धुळवड साजरी करण्यासाठी जी गाणी लावली जातात त्यात प्रामुख्यांने बॉलिवूड गाण्यांचा समावेश असला तरी मराठीतही रंगपंचमीविषयीची गाणी आहेत. हिंदीच्या तुलनेत ती कमी असली तरी ही गाणी लोकप्रिय आहेत. धुळवडीनिमित्त ही गाणी आवर्जून वाजवली जातात. होळीची मराठी (Marathi Holi Songs) आणि हिंदी गाणी इंटरनेटवर सहज आढळतात. अगदी जुन्या गाण्यांपासून ते नव्या गाण्यांपर्यंत ही होळीची खास प्लेलिस्ट तुम्ही तयार करू शकता आणि होळीच्या या खास गाण्यांवर आपल्या परिवारासह धमाल डान्स करू शकता. (Bollywood Holi Songs)
आला होळीचा सण लय भारी- रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटातील हे धमाल गाणं आहे. या गाण्यावर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी डान्स केला आहे.
होली खेले रघुवीरा- ‘बागबान’ या चित्रपटातील हे गाणं असून अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर ते चित्रित करण्यात आलं आहे.
बलम पिचकारी- ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचं हे गाणं नव्या पिढीत लोकप्रिय आहे.
रंग बरसे- अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रीत झालेल्या या सदाबहार गाण्याशिवाय धुळवडीचा आनंद अपूर्णच आहे. होळीच्या प्लेलिस्टमध्ये हा गाणं आवर्जून समाविष्ट केलं जातं.
खेळताना रंग बाई होळीचा- उत्तरा केळकर यांच्या सुमधूर आवाजातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
हेही वाचा:
“तिच्याशी ब्रेकअपनंतर मी बर्बाद झालो”; प्रतीक बब्बरने सांगितला Amy Jacksonसोबतचा कटू अनुभव
The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर सुसाट; 100 कोटींपासून काही पावलं दूर