पतीपासून विभक्त झाल्यानंतर ‘अंगुरी भाभी’ अध्यात्मच्या मार्गावर; आश्रमात फोटो, व्हिडीओ समोर

| Updated on: Feb 11, 2024 | 10:12 AM

'अंगुरी भाभी'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शुभांगी गेल्या काही दिवसांपासून अध्यात्मात वेळ व्यतीत करत आहे. कोईंबतूर इथल्या सदगुरूंच्या आश्रमात ती योगसाधना आणि ध्यानधारणा करतेय.

पतीपासून विभक्त झाल्यानंतर अंगुरी भाभी अध्यात्मच्या मार्गावर; आश्रमात फोटो, व्हिडीओ समोर
शुभांगी अत्रे
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शुभांगीने कमी वयातच लग्न केलं होतं. वयाच्या 20 व्या वर्षी तिने पियुष पुरेशी लग्न केलं आणि आता लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. शुभांगी पतीपासून वेगळी राहत आहे. आयुष्यातील या मोठ्या निर्णयानंतर आणि चढउतारांनंतर आता शुभांगीने अध्यात्मचा मार्ग स्वीकारला आहे. नुकताच तिने बराच वेळ एकांतात घालवला आहे. कोईंबतूर इथल्या सदगुरुंच्या आश्रमात तिने योगसाधना, ध्यानधारणा केली आहे.

या एकांतवासाबद्दल बोलताना शुभांगी म्हणाली, “दूर जाऊन एका योग केंद्रात राहिल्यानंतर मनाला अनोखी शांती मिळाली. या आश्रमात खूप शांतता आहे. इथे मी ध्यानधारणा, योगसाधना करू शकतेय आणि इथल्या निसर्गसौंदर्यात मन खूप प्रसन्न राहतं. अध्यात्मिक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जेमुळे माझ्या मनावर खूप चांगला प्रभाव झाला आहे. या क्षणांसाठी मी खूप आभारी आहे.” गेल्या वर्षी शुभांगीने तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांविषयीचा खुलासा केला होता. पतीपासून वेगळं राहत असल्याचं तिने सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

“जवळपास वर्षभरापासून आम्ही एकत्र राहत नाही. आमचा संसार वाचवण्यासाठी पियुष आणि मी खूप प्रयत्न केले. एकमेकांचा आदर, साथ, विश्वास आणि मैत्री हे मजबूत लग्नाचा पाया असतात. मात्र जसजशी वेळ पुढे निघून गेली, तसतसं आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांमधील वाद मिटवू शकत नाही आहोत. म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेतला”, असं शुभांगी म्हणाली.

“माझ्याने आता पुन्हा प्रेम होणारच नाही. प्रेमाच्या कोणत्याही नात्यासाठी मी माझ्या आयुष्यातील सर्व मार्ग बंद केले आहेत. माझं लग्न कमी वयात झाल्याने मी आईसुद्धा लवकर झाले होते. आता माझी मुलगी 18 वर्षांची असून ती अमेरिकेत शिक्षण घेत आहे. माझी मुलगीच माझी सर्वांत चांगली मैत्रीण आहे. तिच्याकडून मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात”, असं शुभांगीने सांगितलं होतं.

शुभांगीने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. या मालिकेत तिने पलचीन बासूची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘कस्तुरी’ आणि ‘दो हंसो का जोडा’ यांसारख्या मालिकेत काम केलं होतं. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे शुभांगीला आणखी लोकप्रियता मिळाली.