गुहागरच्या आठवणींमध्ये रमली तन्वी मुंडले, पहा सेटवरील फोटो

| Updated on: Apr 07, 2022 | 5:31 PM

कलर्स मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या 'भाग्य दिले तू मला' मालिकेमध्ये अभिनेत्री तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे.

1 / 5
कलर्स मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या 'भाग्य दिले तू मला' मालिकेमध्ये अभिनेत्री तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेवर मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम आहे.

2 / 5
तिथे शूट करत असताना कावेरी म्हणजेच तन्वीने आणि सेटवरील बाकीच्या सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली आहे. त्यातलेच काही हे फोटोज. तन्वीचा मालिकेतील लुक, कावेरी आणि राजवर्धनची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

3 / 5
राजवर्धनची भूमिका विवेक सांगळे साकारत आहेत. तन्वीने गुहागर शूटिंग दरम्यानचे काही किस्से सांगितले. ती म्हणाली, “तिकडे शूट करताना खूपच मज्जा आली, मी स्वत: कोकणची असले तरीदेखील मी पहिल्यांदाच गुहागर ठिकाणी कामासाठी म्हणून आले. खूप कमाल अनुभव होता."

4 / 5
"प्रत्येक गोष्ट खूप सुंदर होती. मग समुद्र असो वा छोट्या छोट्या पायवाटा असो, सगळं हिरवगार. सगळं असं खूप समृध्द आपण म्हणतो ना तसं होतं. मी पाहिल्यांदा साडी नेसून सायकल चालवली, हा अनुभव खूप मस्त होता. मुंबईमध्ये आल्यावर मी माझ्या सायकलला खूप मिस करते आहे," असं तिने सांगितलं.

5 / 5
"आम्ही शूटिंग तर केलंच पण, तिथून अनेक आठवणी घेऊन आलो आहोत. हा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील," अशा शब्दांत तन्वी व्यक्त झाली. भाग्य दिले तू मला ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.