मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारतरत्न लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. कोरोनामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या तब्येतीबाबत नवनवी माहिती समोर येतीय. कधी त्यांच्या तब्येत सुधारावी यासाठी प्रार्थनेचं आवाहन केलं जातंय तर कधी त्यांच्या तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं जातंय. आता त्यांच्या तब्येतीविषयी नवी माहिती समोर येतीय. त्यांच्या प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं त्यांच्या टीमने सांगितलं आहे.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत सातत्याने चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. सोशल मीडियावर रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. मात्र व्हायरल मेसेजवर कसलाही विश्वास ठेऊ नका. त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. खोट्या बातम्या पसरवणे बंद करा, असं खुद्द लतादीदींनीच त्यांच्या ट्विटरवरुन सांगितलं.
ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रताह यांच्याकडून एक अपडेट समोर आली आहे. “लता दीदींची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांना लवकर बरं करण्यासाठी आमची टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. तुमच्याही प्रार्थनेची गरज आहे”, असं त्यांनी म्हटलंय.
त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. आणि डॉक्टर त्यांच्या संपूर्ण टीमसह त्यांच्यावर उपचार करत आहेत. आम्ही लता दीदींना रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया मंगेशकर कुटुंबाच्या जवळची गायिका अनुषा श्रीवासन यांनी दिली.
वास्तविक, गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर लता मंगेशकर यांची प्रकृती खूपच बिघडल्याच्या बातम्या येत होत्या, त्यामुळे दीदींचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. यानंतर अनुषाने सर्वांना आवाहन केले की, ‘कृपया या खोट्या अफवा पसरवू नका. दीदींसाठी तुम्ही प्रार्थना करा.’
संबंधित बातम्या