पॉर्नस्टार जॉनी सिन्सला समजून बसली जॉन सीना; रणवीरच्या जाहिरातीतील ‘ती’ अभिनेत्री कोण?

| Updated on: Feb 17, 2024 | 1:38 PM

अभिनेता रणवीर सिंहची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या जाहिरातीत तो जॉनी सिन्ससोबत काम करताना दिसतोय. या जाहिरातीवर काही टीव्ही कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही जाहिरात म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीसाठी चपराक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पॉर्नस्टार जॉनी सिन्सला समजून बसली जॉन सीना; रणवीरच्या जाहिरातीतील ती अभिनेत्री कोण?
रणवीर सिंहची जाहिरात चर्चेत
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 17 फेब्रुवारी 2024 | अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे तुफान चर्चेत आहे. ‘बोल्ड केअर’ या ब्रँडसाठी त्याने ही जाहिरात केली असून यामध्ये त्याच्यासोबत पॉर्नस्टार जॉनी सिन्ससुद्धा झळकला आहे. एका मालिकेच्या स्वरुपात ही जाहिरात शूट करण्यात आली आहे. त्यामुळे काही टीव्ही कलाकारांनी त्यावर आक्षेपसुद्धा घेतला आहे. रणवीर आणि जॉनी सिन्सच्या या जाहिरातीत ज्या अभिनेत्रीने भूमिका साकारली आहे, तिचं नाव भावना चौहान आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भावनाने ही जाहिरात शूट करण्याचा अनुभव सांगितला. आश्चर्याची बाब म्हणजे जाहिरातीत आपण पॉर्नस्टार जॉनी सिन्ससोबत काम करणार आहोत, हे तिला माहितच नव्हतं.

भावना ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘रझिया सुल्तान’ या मालिकेत आणि ‘शिकारा’, ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. भावनाने सांगितलं की या जाहिरातीची स्क्रिप्ट तिला मजेशीर वाटली, म्हणून तिने त्यासाठी ऑडिशन दिलं होतं. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आपण या जाहिरातीत पॉर्नस्टार जॉनी सिन्ससोबत काम करणार आहोत, याची तिला आधी कल्पनाच नव्हती. तर रेसलर जॉन सीनासोबत काम करणार असल्याचं तिला वाटलं होतं.

हे सुद्धा वाचा

याविषयी भावना म्हणाली, “मला माहीत नाही की मी त्याचं नाव चुकीचं कसं वाचलं. पण मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता की जॉनी अशा प्रकारच्या जाहिरातीत काम करेल. मी विचार केला की रेसलर भारतात बऱ्याचदा विविध जाहिराती करतात, त्यामुळे जॉनी सिनाने या जाहिरातीला होकार दिला असेल. नंतर मला समजलं की तो जॉन सीना नाही तर जॉनी सिन्स आहे. या जाहिरातीत रणवीर सिंहसोबत काम करून खूप मज्जा आली. आमची एनर्जी बरीच मॅच होते आणि माझ्यासोबत काम करून कसं वाटलं, हेसुद्धा त्याने सांगितलं होतं. मला जॉनीसोबत बोलण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र तो खूपच प्रोफेशनल आहे.”

या जाहिरातीवर होणाऱ्या टीकांबद्दलही भावनाने प्रतिक्रिया दिली आहे. “या जाहिरातीला एका मालिकेच्या सर्वसामान्य सीनप्रमाणे शूट करण्यात आलं आहे, जेणेकरून त्याला प्रेक्षक पाहू शकतील. यात कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. सेक्शुअल हेल्थबद्दल सर्वसामान्यपणे बोलता यावं, यासाठी ही जाहिरात बनवण्यात आली आहे”, असं तिने स्पष्ट केलं.