अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान याने नुकताच त्याच्या करियरला सुरुवात केली आहे. अरहान याने पॉडकास्ट विश्वात पदार्पण केलं आहे… सध्या अरहान पॉटकास्ट ‘डम्ब बिरयानी’ मुळे तुफान चर्चेत आहे. ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट तीन खान मित्र अरहान खान, देव रैयानी आणि आरुष वर्मा यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. ‘डम्ब बिरयानी’चे 6 पार्ट यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहेत…
दरम्यान, अरहान याच्या ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्टाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अरहान त्याचे मित्र आणि मलायका हिच्या मैत्रीणी नीलम, महीप कपूर, भावना आणि सीमा सजदेह यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहे.
अरहान म्हणते आईच्या मैत्रीणींना सांगतो, पॉडकास्टच्या पूर्वी आणि एक रिऍलिटी शो करण्याचा विचार करत होतो. यावर माहिप, अरहानला विचारते, ‘तुझं आयुष्य एवढं मजेदार आहे का तू रऍलिटी शो करण्याचा विचार करतोय?’ गप्पा सुरु असताना माहीप आणि भावना पांडे, मलायका हिला फोन करतात.
मलायका हिला फोन केल्यानंतर दोघी तिच्याकडे अरहान याची तक्रार करतात. माहीप, मलायका म्हणते, ‘तुझ्या मुलाला काही कळत नाही… त्याला जरा चौकटीत ठेव…’ माहीप असं म्हणाल्या नंतर जमलेले सर्व हसू लागतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरहान खान याच्या पॉडकास्टची चर्चा रंगली आहे.
अरहान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, मलायका आणि अरबाज यांचा मुलगा असल्याामुळे त्याची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. अराहन याचा जन्म 2002 मध्ये झाला. त्याने अनेरिकेतून फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. एवढंच नाहीतर, बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या अनेक प्रोजेक्टमध्ये अरहान याने असिस्ट केलं आहे.
अरहान फक्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अरहान याला अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं होतं. अनेकदा दोघांना एकत्र पाहिल्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.