मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसते. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडलीये. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप (Serious charges) केले आहेत. दयाबेन नेमक्या कोणत्या कारणामुळे मालिकेत पुनरागमन करणार नसल्याचे कारणही एका अभिनेत्रीने थेट सांगून टाकले आहे. असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत गेल्या काही वर्षांपूर्वी टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता अर्थात भव्य गांधी हा नेहमीच चर्चेत असतो. भव्य गांधी याची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. भव्य गांधी याने अगदी कमी वयामध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली आणि त्याला टप्पूच्या भूमिकेतून खास ओळख ही मिळाली आहे.
भव्य गांधी याने आता तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडून बरीच वर्ष झाली आहेत. अभ्यासाच्या कारणामुळे भव्य गांधी याने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला रामराम केला होता. त्यानंतर मालिकेत अनेक कलाकरांनी टप्पूची भूमिका साकारली. टप्पू अर्थात भव्य गांधी याला आता अत्यंत मोठा चित्रपट मिळाला आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेनंतर भव्य गांधी हा चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. भव्य गांधी हा लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. न्यू बिगनिंग्समध्ये भव्य गांधी हा दिसणार आहे. यापूर्वीच बऱ्याच गुजराती चित्रपटांमध्ये भव्य गांधी याने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, ते चित्रपट काही धमाल करू शकले नाहीत.
जेनिफर मिस्त्री अर्थात मिसेस सोढीने सर्वात अगोदर असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावले. जेनिफर मिस्त्री हिच्यानंतर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया हिने देखील असित मोदीवर आरोप केले आहेत. असित मोदी यांच्यावर होत असलेल्या आरोपांनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.