मुंबई : अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. ‘भोला’ची सुरुवात जरी ठीक-ठाक राहिली असली तरी वीकेंडला कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, संजय मिश्रा, आमला पॉल आणि दीपक डोब्रियाल यांच्या भूमिका आहेत.
प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी ‘भोला’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत या चित्रपटाची कमाई 44.28 कोटी रुपयांच्या घरात झाली आहे. ‘भोला’ ज्या दिवशी प्रदर्शित झाला, तेव्हाच साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. भोलाच्या तुलनेत ‘दसरा’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
गुरुवार- 11.20 कोटी रुपये
शुक्रवार- 7.40 कोटी रुपये
शनिवार- 12.20 कोटी रुपये
रविवार- 13.48 कोटी रुपये
एकणू- 44.28 कोटी रुपये
शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर ‘भोला’ हा चांगली ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. पठाणने पहिल्याच दिवशी तब्बल 57 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रणबीर कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने 15.73 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
#Bholaa puts up a healthy score in its *extended* 4-day weekend… The spike on Sat and Sun added strength to its overall total… Thu 11.20 cr, Fri 7.40 cr, Sat 12.20 cr, Sun 13.48 cr. Total: ₹ 44.28 cr. #India biz.#Bholaa needs to maintain the momentum over weekdays… In fact,… pic.twitter.com/RQKL7quyrq
— taran adarsh (@taran_adarsh) April 3, 2023
‘भोला’ची ही कमाई ‘दृश्यम 2’च्या तुलनेत कमी आहे. दृश्यम 2 ने पहिल्या दिवशी जवळपास 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र वीकेंडला भोलाच्या कमाईत चांगली वाढ पहायला मिळाली आहे. भोलाचा बजेट 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातंय.
भोला या चित्रपटाच्या माध्यमातून आमला पॉल ही पहिल्यांदाच बाॅलिवूडमध्ये काम करतेय. आमला ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आमलाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तर दिग्दर्शक म्हणून अजयचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी त्याने यू मी और हम, शिवाय आणि रनवे 34 या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.