Bholaa | अजय देवगणचा ‘भोला’ शाहरुखच्या ‘पठाण’चाही रेकॉर्ड मोडणार? पहिल्या दिवशी होऊ शकते धमाकेदार कमाई

| Updated on: Mar 30, 2023 | 1:08 PM

19 मार्चपासून ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. खुद्द अजयने तब्बूसोबत व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात झाली.

Bholaa | अजय देवगणचा भोला शाहरुखच्या पठाणचाही रेकॉर्ड मोडणार? पहिल्या दिवशी होऊ शकते धमाकेदार कमाई
Ajay Devgn and Tabu
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई : अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. गुरुवारी प्रदर्शित झाल्याने वीकेंडपर्यंत या चित्रपटाची कमाई दमदार होईल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करत नव्हते. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉलिवूडला नवसंजीवनी दिली. तर अजयच्या ‘दृश्यम 2’नेही चांगली कमाई केली होती. आता त्याचा ‘भोला’ पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवू शकेल, याचा अंदाज वर्तवला जात आहे. भोलाची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा सकारात्मक झाली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते ‘भोला’ हा चित्रपट पहिल्या दिवशी जवळपास 15 कोटी रुपयांची कमाई करू शकेल. तमिळ चित्रपट ‘कैथी’चा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजयनेच केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची 14 हजार तिकिटं विकली गेली आहेत. त्यातून जवळपास 3.19 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हा आकडा रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटापेक्षा पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. भोलासोबतच साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर पहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा

‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत.

या चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, आमला पॉल, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि कैदी भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते.

‘भोला’ची ॲडव्हान्स बुकिंग

19 मार्चपासून ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. खुद्द अजयने तब्बूसोबत व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर दोन-तीन तासांतच आयमॅक्स आणि 4 डीएक्स व्हर्जनसह संपूर्ण देशात जवळपास 1200 तिकिटं विकली गेली होती. त्यामुळे या नऊ दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगद्वारे दमदार कमाई झाल्याचं कळतंय.