मुंबई | बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनेत्यांसोबत लग्न केलं. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्यांनी श्रीमंत उद्योजक आणि राजकारणातील व्यक्तींसोबत लग्न केलं. आता देखील बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘लव्हस्टोरी’ चव्हाट्यावर आली आहे. कारण अभिनेत्रीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ देखील व्हायरल होतं. पण अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.
सध्या ज्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या ‘लव्हस्टोरी’ची चर्चा तुफान रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत भूमीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला ट्रोल करत आहेत.
भूमी मध्यरात्री ज्या व्यक्तीसोबत स्पॉट झाली, तो श्रीमंत उद्योजक यश कटारिया (Yash Kataria) आहे. दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने भूमी पेडणेकर आणि तिचा बॉयफ्रेंड यश कटारिया याचा व्हिडीओ पोस्ट केलं आहे. सध्या सर्वत्र भूमी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.
व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘काय करु भाऊ माझं हसूच थांबत नाहीये…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हा तर आपला चिंटू आहे…’ एवढंच नाही तर, एका नेटकऱ्याने यश कटारिया याची तुलना ड्रायव्हरसोबत केली आहे. भूमी हिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘ड्रायव्हरलाच बॉयफ्रेंड बनवलं का?’ असं एक नेटकरी म्हणाला आहे. सध्या सर्वत्र भूमी आणि यश यांची चर्चा रंगत आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून यश आणि भूमी रिलेशनशिपमध्ये आहेत. यश कटारिया आणि भूमी पेडणेकर एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून डेट कसल्याची चर्चा आहे. पण यश याच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण सोशल मीडियावर मात्र दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगत आहे.
यश एक उद्योजक असून त्याचं वय २८ वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. भूमी सोशल मीडियावर देखील यशला फॉलो करते. पण यशचं सोशल मीडियावर अकाउंट प्रायव्हेट आहे. तर यश अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा देखील खास मित्र आहेत. अशात अफेअरच्या रंगत असताना भूमी कधी यश याच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार करते याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.