बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आज 57 वयाची झालीये. आज माधुरी दीक्षितचा वाढदिवस असून सकाळपासूनच चाहते हे अभिनेत्रीला शुभेच्छा देताना दिसत आहेत. माधुरी दीक्षित हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये नक्कीच गाजवला आहे. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर माधुरी दीक्षित ही तब्बल 34 वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. माधुरी दीक्षितने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. माधुरी दीक्षित ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही कायमच चर्चेत राहिली आहे.
माधुरी दीक्षितने जरी चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. मात्र, तिच्या आई वडिलांची अजिबातच इच्छा नव्हती की, तिने चित्रपटांमध्ये काम करावे. फार कमी लोकांना हे माहिती आहे की, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना माधुरी दीक्षितच्या आई वडिलांनी माधुरीसोबतच्या लग्नासाठी प्रस्ताव पाठवला होता. चक्क सुरेश वाडकर यांनी लग्नासाठी माधुरीला नकार दिला होता.
त्याचे झाले असे की, माधुरी दीक्षितचे आई वडिल लग्नासाठी तिला मुलगा शोधत होते. त्यावेळी त्यांना माधुरीसाठी गायक सुरेश वाडकर हे योग्य मुलगा वाटले. मग त्यांनी माधुरीचे स्थळ त्यांच्यासाठी पाठवले. मात्र, सुरेश वाडकर यांनी स्पष्टपणे माधुरी दीक्षितसोबत लग्न करण्यास नकार दिला. दोघांच्या वयामध्ये बारा वर्षाचे अंतर होते.
सुरेश वाडकर यांनी वयाच्या अंतरामुळे नव्हे तर माधुरी दीक्षित दिसायला अत्यंत बारीक असल्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर माधुरी दीक्षित हिचे नाव काही अभिनेत्यांसोबत जोडले गेले. 1999 मध्ये माधुरी दीक्षित हिने यूएस स्थित डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले. आता माधुरी दीक्षित हिला दोन मुले देखील आहेत.
बऱ्याच वेळा माधुरी दीक्षित ही आपल्या मुलांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. लग्नानंतर काही वर्षे माधुरी दीक्षित ही विदेशात होती. आता माधुरी दीक्षित ही परत भारतामध्ये परतलीये. माधुरी दीक्षित हिने हिट चित्रपट आतापर्यंतच्या करिअरमध्ये बाॅलिवूडली दिली आहेत. माधुरी दीक्षित हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.