बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण करणार राजकारणात प्रवेश?, राज्यातील ‘या’ मोठ्या नेत्याने…

| Updated on: Oct 12, 2024 | 6:55 PM

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन पाचचा विजेता ठरल्याचे बघायला मिळाले. सूरज सोशल मीडियावरही सक्रिय असतो.

बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण करणार राजकारणात प्रवेश?, राज्यातील या मोठ्या नेत्याने...
Suraj Chavan
Follow us on

‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांनी सर्वांनाच मोठा धक्का देत हे सीजन 70 दिवसांमध्ये संपवणाचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच फिनाले विकला सुरूवात झाली. विशेष बाब म्हणजे बिग बॉस मराठीचे हे सीजन सुरूवातीपासूनच धमाकेदार कामगिरी करताना दिसले. सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ होती आणि हेच नाही तर टीआरपीही जबरदस्त राहिले. बिग बॉस हिंदीमुळे निर्मात्यांना हे सीजन 70 दिवसांमध्ये संपवावे लागले. बिग बॉस मराठीचा फिनाले काही दिवसांपूर्वीच झाला असून सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता ठरलाय. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण यांच्यात मोठा मुकाबला बघायला मिळाला.

अखेर सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला. सूरज बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार काैतुकांचा वर्षाव करण्यात आला. अनेक राजकिय मंडळींनी सूरजच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याचे काैतुक केले. सूरजही सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो.

आता सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर थेट अजित पवार यांच्या भेटीला पोहोचला. सूरज हा बारामतीमधील मोढवे गावाचा आहे. अजित पवार यांची सूरज चव्हाण याने भेट घेतल्याने सूरज राजकारणात तर प्रवेश करणार नाही ना? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आता त्याबद्दलच बोलताना अजित पवार हे दिसले आहेत.

अजित पवार हे म्हणाले की, सूरजचा राजकीय प्रवेशावर विचार नाही. सूरज हा आमच्या बारामतीमधील मोढवे गावाचा आहे. सुरवातीला रिल्स काढत असताना सूरजला बिग बॉसमध्ये संधी मिळाली. सूरजचा मनमोकळा स्वभाव आणि थोडं बोलण्यात अडकण हे लोकांना भावले. माझा कायमच सूरज चव्हाणला पाठिंबा असेल.

सूरज चव्हाण याला त्याच्या मुळगावी अजित पवार हे घर देखील बांधून देणार आहेत. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यापासूनच सूरज चव्हाण याचे नशीब उजळल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात असतानाच सूरजचा चित्रपटाची ऑफर आल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर सूरजचा जबरदस्त अंदाज लोकांना आवडला.