बाबा सिद्दिकी हत्येबाबत सलमान खानचे वडील सलीम खान यांचा मोठा खुलासा

| Updated on: Oct 19, 2024 | 6:55 PM

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची चर्चा आहे. पण पोलिसांनी अजूनही या बाबतीत कोणताही दावा केलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या सलमान खानमुळे झाल्याचा आरोप देखील होत होता. त्यावर सलीम खान यांनी मोठा खुलासा केला आहे.

बाबा सिद्दिकी हत्येबाबत सलमान खानचे वडील सलीम खान यांचा मोठा खुलासा
Follow us on

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची तीन लोकांची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. पण पोलिसांनी असा कोणताही दावा केलेला नाही. पोलीस या हत्येचा तपास करत आहे. दुसरीकडे सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. या सगळ्या प्रकरणावर लेखक आणि चित्रपट निर्माता सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या मुलाने कधीही काळवीटाची शिकार केली नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला सतत धमक्या आल्या आणि आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले.

लॉरेन्स गँगकडून धमक्या आल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानने राजस्थानमधील बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी लॉरेन्स गँगची इच्छा आहे. ऑक्टोबर 1998 मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे काळवीट शिकार प्रकरण घडले होते. ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना ही घटना घडली होती.

खंडणीच्या धमक्यांबाबत सलीम खान म्हणाले की, “सलमानला मिळणाऱ्या या धमक्या म्हणजे खंडणीशिवाय काहीच नाही. सलमानने कोणाची माफी मागावी? तुम्ही किती लोकांची माफी मागितली? तुम्ही किती प्राण्यांना वाचवले? त्याचीही माफी मागावी.” ज्याच्यासोबत तुम्ही गुन्हा केला आहे, ज्याचे पैसे तुम्ही खाल्लेत त्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले की “सलमानने काही गुन्हा केला आहे का? तुम्हाला माहीत आहे का? आम्ही कधी बंदुकीचा वापरही केला नाही.” त्याला प्राणी मारण्याची आवड नव्हती. त्याला प्राण्यांची आवड होती.

सिद्दीकीच्या हत्येचा सलमानशी काहीही संबंध नाही, असे ही सलीम खान म्हणाले, “पोलीस आमच्या सुरक्षेसाठी सर्व काही करत आहेत. आम्हाला त्यांचे पालन करावे लागेल. आम्हाला सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे आमचे स्वातंत्र्य थोडे कमी झाले आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येचा कोणताही संबंध नाही. मालमत्तेच्या वादातून बाबा सिद्दिकीची हत्या झाली आहे.