मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आमिर खान याचे हे फोटो (Photo) पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण या फोटोमध्ये आमिर खान याची पांढरी दाढी, वाढलेले टोक्यावरील केस आणि थकलेला चेहरा पाहून चाहते हैराण झाले. लाल सिंह चड्ढा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा निराश असल्याचे सांगितले जाते.
लाल सिंह चड्ढा चित्रपटाकडून आमिर खान याला मोठ्या अपेक्षा नक्कीच होत्या. लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खान याच्यासोबत करिना कपूर खान ही मुख्य भूमिकेत दिसली. मात्र, लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. लाल सिंह चड्ढा चित्रपटाला सोशल मीडियावर देखील मोठा विरोध हा करण्यात आला. याचाच फटका बसल्याचे बोलले जातंय.
लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आमिर खान याने अत्यंत मोठा निर्णय घेतला. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर आहे. इतकेच नाही तर आमिर खान हा सोशल मीडियावर देखील फार जास्त सक्रिय दिसत नाहीये. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच आलेल्या रिपोर्टनुसार आमिर खान हा आता मुंबई सोडून चेन्नईमध्ये शिफ्ट होतोय. आता अजून एक रिपोर्ट आमिर खान याच्याबद्दलच आलीये. रिपोर्टनुसार आमिर खान याचे मुंबईतील पाली हिल परिसरात मोठे अपार्टमेंट आहे. अभिनेत्याकडे बेला व्हिस्टा आणि मरीना अपार्टमेंट आहेत. मात्र, आता हे अपार्टमेंट पाडण्यात येत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
रिपोर्टनुसार आमिर खान याचे अपार्टमेंट पाडून पुन्हा बांधण्यात येणार आहे. यामुळेच आता आमिर खान हा चेन्नईमध्ये शिफ्ट होतोय. आमिर खान याच्या आईवर चेन्नई येथे उपचार सुरू आहेत. आमिर खान हा जास्तीत जास्त काळ आपल्या आईसोबत राहू इच्छित असल्याने तो चेन्नई येथे शिफ्ट होणार आहे. मात्र, आमिर खान मुंबईमध्ये कधी परणार याबद्दल काही कळू शकले नाहीये.