मुंबई : अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवलाय. अनेक हिट चित्रपट यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा चाहता वर्ग मोठा आहे. तब्बल 33 वर्षांनंतर आता परत एकदा अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे एकसोबत चित्रपटात धमाका करताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे थलायवर 170 चित्रपटात धमाका करणार आहेत. आता याच चित्रपटाबद्दल मोठे अपेडट आले आहे.
थलायवर 170 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. आता या चित्रपटाबद्दलचे अपडेट ऐकून चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. लायका प्रोडक्शनने इंस्टाग्रामवर एक अत्यंत खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी करताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या मोबाईलमध्ये पाहताना रजनीकांत हे दिसत आहेत. यासोबत अत्यंत मोठी माहिती ही शेअर करण्यात आलीये. थलायवर 170 चित्रपटाचे मुंबईतील शूटिंग शेड्यूल पूर्ण झाल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलीये. रिपोर्टनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
When Superstar and Shahenshah met on the sets of #Thalaivar170 🤩
Reunion on screens after 33 years! 🤗 #Thalaivar170 is gonna be double dose of legends! 💥 @rajinikanth @SrBachchan
Done with MUMBAI Schedule 📍📽️✨@tjgnan @LycaProductions #Subaskaran @gkmtamilkumaran… pic.twitter.com/LfyV3rP2JI
— Lyca Productions (@LycaProductions) October 29, 2023
कॅप्शनमध्ये देण्यात आले की, जेव्हा सुपरस्टार शहेनशाहला थलायवर 170 च्या सेटवर भेटला… 33 वर्षांनंतर पुनर्मिलन… या चित्रपटात दिग्गजांचा डबल डोस बघायला मिळणार. आता हिची पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून यावर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट देताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये थेट एका चाहत्याच्या गाडीवर फिरताना अमिताभ बच्चन हे दिसले होते. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसले.