मुंबई : शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले. नुकताच डंकी चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. हा चित्रपट क्रिसमसला रिलीज होणार आहे. आता डंकीचा टीझर रिलीज होताच प्रभास याच्या सालार चित्रपटाबद्दलच्या हालचाली वाढल्याचे देखील बघायला मिळतंय. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे.
मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याचे चित्रपट मोठे धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. एका मागून एक असे चित्रपट शाहरुख खान याचे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच जवान हा चित्रपट देखील रिलीज झाला.
शाहरुख खान याच्या जवान आणि पठाण या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हाच ठरलाय. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला. दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते.
Arrival Of Mass God Indian Cinema 🔥 , The One N Only REBELSTAR #Prabhas𓃵 In 50 Days 🔥#Salaar #SalaarCeaseFire #SalaarComingBloodySoon @SureshPRO_ @TrendsPrabhas @ImRajShiva @Prasad_Darling
💖My Insta link 🖇️https://t.co/GOENBAmZfd
🔥🔥🔥 pic.twitter.com/8vgfWIaJ7G
— Pardhu (@mrcreations6675) November 2, 2023
सतत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. आता शाहरुख खान याच्या डंकी या चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. शाहरुख खान याचा डंकी आणि प्रभास याचा सालार चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊ शकतो. सालार चित्रपटाच्या रिलीजची तारीख ही काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आली.
सध्याच्या हालचाली पाहून या चित्रपटांमध्ये क्लॅश होऊ शकतात. डंकी चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासून तर सालार चित्रपटाचे निर्माते देखील सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये डंकी या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. आता पठाण, जवाननंतर डंकी हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.