Baba Siddique Case: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोक्का न्यायालयाने आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने शनिवारी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आठ आरोपींना 16 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली असून, 30 नोव्हेंबर रोजी या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू करण्यात आला.
कथित मुख्य शूटर शिवकुमार गौतमसह आठ आरोपींना शनिवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर विशेष न्यायाधीश एएम पाटील यांच्यासमोर मोक्का अंतर्गत रिमांडसाठी हजर करण्यात आले. तपास यंत्रणेच्या मागणीनुसार न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
उर्वरित आरोपी आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई या गुन्ह्यात फरार आहेत. सांगायचं झालं तर, महाराष्ट्राचे माजी मंत्री सिद्दीक (66) यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबार होताच बाबा सिद्दीकी यांनी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सांगायचं झालं तर, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. शिवाया लॉरेन्स बिष्णोई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. सलमान खान याच्या मदतीसाठी जो कोणी पुढे येईल त्याने स्वतःचा हिशेब करुन ठेवावा… असं फेसबूक पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याला पुन्हा धमकी आली. सलमान खानला सतत येणाऱ्या जीवेमारण्याच्या धमक्यांमुळे अभिनेत्यांच्या सुक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. कारण बाबा सिद्दीकी यांच्यानंतर बिष्णोई गंँगच्या निशाण्यावर सलमान खान आहे.