‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर काहींचं स्वप्न फक्त स्वप्न म्हणून राहातं… ‘बिग बॉस’च्या घरात विशेषतः स्टार्स आणि प्रसिद्ध व्यक्ती येतात. अशात अभिनेता सलमान खान याच्या शोचा भाग व्हायला कोणाला आवडणार नाही. ‘बिग बॉस’ शोमध्ये येण्यासाठी अनेक सेलिब्रिटी प्रयत्न करत असतात. पण काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये येण्यासाठी काळी जादू देखील केली आहे आणि काळी जादू करत शोमध्ये स्पर्धक म्हणून स्वतःचं स्थान प्राप्त केलं आहे.
‘बिग बॉस’मध्ये काळी जादू करुन येणारा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नाही तर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू होता. ‘बिग बॉस 14’ मध्ये जान स्पर्धक म्हणून सर्वांच्या भेटीस आला. नुकातच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये जान पोहोचला आणि त्याने धक्कादायक खुलासा केला. ‘बिग बॉसमध्ये काळी जादू करुन आलो होतो…’ असं वक्तव्य जान कुमार याने केलं.
जान कुमार सानू यांच्या वक्तव्याची व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस’च्या शोमध्ये तू नेपोटिज्मच्य आधारावर आला होतास की, तुझी काही ओळख होती. यावर जान कुमार सानू याने मोठा खुलासा केला. म्हणाला, ‘मी पूर्वी देखील सांगितलं आहे की, मी बंगालचा आहे. बिग बॉसमध्ये काळी जादू करुन आलो आहे..’
‘मी खरं सांगत आहे. मी कलकत्त्याला गेलो आणि तिथे एका महिलेला भेटलो… तिला भेटलो तेव्हा तिने अनेक माकडं पाळल्याचं चित्र मला दिसलं. मी तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा कळलं ते माकडं नव्हती तर, माणसांना तिने माकड केलं होतं… जेव्हा मी ते सर्व पाहिलं तेव्हा मला कळलं मी योग्य ठिकाणी आलो आहे…’
‘मला जे हवं आहे ते मी त्या महिलेला सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली, त्यासाठी काही बकऱ्यांचा बळी द्यावा लागेल… काळ्या रंगाचा जो पुतळा असतो, त्याचा वापर होताना मी पाहिलं आहे. माझं ध्येय मोठं होतं त्यामुळे मी केलं. त्यानंतर बिग बॉसमधून मला फोन आला.’
जान कुमार सानू पुढे म्हणाला, ‘मी मुंबईत आल्यानंतर 4 दिवसांत मला फोन आला. कलर्सकडून मला फोन आला आणि हे खरं झालेलं आहे…’ जान कुमार सानू याच्या मोठ्या वक्तव्यामुळे सर्वांना धक्का बसला. सध्या सोशल मीडियावर जान कुमार सानू याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.