मुंबई – कलर्स टिव्हीवरती बिग बॉसचा (Bigg Boss 15) शो अंतिम टप्प्यात आल्याचे आपण पाहतोय. हा आठवडा इतका महत्त्वाचा आहे की, या आठवडा बिग बॉसचा ग्रॅड फिनाले (grand finale) होईल. होणा-या कार्यक्रमात अनेक बॉलिबूडचे दिग्गज कलाकार समाविष्ठ असतील अशी माहिती आहे. त्यांच्यामधील एक स्पर्धेक ती टॉपची स्पर्धेत राखी सावंत (Rakhi Sawant) या शो मधून बाहेर पडली आहे. पण ती अंतिम टप्प्यात होणा-या ग्रॅड फिनालेमध्ये सामिल होणर आहे. विशेष म्हणजे ती आपल्या पतीसोबत सामिल होणार असल्याची माहिती मिळत आहे. राखी सावंतने अभिजीत बिचकुलेवर (abhijeet bichukale) जोरदार शाब्दिक हल्ला केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. राखी म्हणते की अभिजीतने समाधी घेतली आहे. सलमानबाबत (salman khan) वादग्रस्त विधान केल्यानंतर राखी सावंतने त्याला फटकारलं आहे.
व्हिडीओ व्हायरल
अभिजीत बिचुकले याला राखी सांवतने सुनावल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये राखी सावंत पति रितेश सिंह सोबत दिसत आहे. राखीने आपला अनोखा ड्रेस घातला असून बिग बॉसच्या अंतिम कार्यक्रमात ती पतीसोबत दिसणार आहे. लग्नानंतर दोघांच्यामध्ये अनेक वाद झाले होते, परंतु आता दोघेही एकत्र दिसल्याने चाहत्यांना आश्र्चर्य वाटले आहे.
सलमानच्या प्रेमा खातीर बिचुकलेला झापलं
वादग्रस्त विधानासाठी प्रसिध्द असलेले अभिजीत बिचुकले हे कायम वादविवादीत बोलत असतात. नुकतेच त्यांनी सलमान खानबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि पुन्हा चर्चेला सुरूवात झाली. मी सलमान बघून घेईन असं म्हणाल्यामुळे बिचुकलेला एक वेगळी प्रसिध्दी मिळाली. परंतु राखी सावंत यांनी सलमान खान प्रति असलेल्या प्रेमावर बिचुकलेवरती जोरदार हल्ला केला. ती म्हणाली की, बिचुकले यांनी समाधी घेतली आहे. तसेच सलमानबाबत कोणी काही बोललं तर त्याचा बँड वाचवल्याशिवाय सोडणार नाही.
या कारणामुळे बिग बॉसमधून बिचुकलेनी केली सलमान खानवर टीका
बिग बॉसमधून अभिजीत बिचुकले यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर अभिजीतने सलमान खानवरती वादग्रस्त विधान केले होते. सलमान खानला बघून घेईल असं बिचुकले म्हणाला होता. बिचुकले बाहेर पडल्यानंतर अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. त्यामध्ये त्याने फक्त सलमान खानला टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं. कारण सलमान खानला टार्गेट केल्यानंतर आपल्याला अधिक प्रसिध्दी मिळेल अशी सोशल मीडियावर ट्रोलर करण्याची चर्चा असल्याचे पाहायला मिळाले.