मुंबई : बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, असे असताना देखील बिग बाॅसच्या घरातील काही सदस्य हे चर्चेत आहेत. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला म्हणजे घरातील मंडली. बिग बाॅसच्या इतिहासात पहिल्यांदा खरी मैत्री ही बघायला मिळाली. शिव ठाकरे, साजिद खान, सुंबुल ताैकीर, अब्दू रोजिक, एमसी स्टॅन आणि निम्रत काैर (Nimrit Kaur) यांच्यामध्ये खरी मैत्री बघायला मिळाली. विशेष म्हणजे शोच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही मैत्री कायमच टिकून होती. मंडलीला प्रेक्षकांचे देखील जबरदस्त असे प्रेम मिळाले. अर्चना गाैतम (Archana Gaitam) हिने या मंडलीचे नाव ठेवले.
बिग बाॅस 16 नंतर मंडलीमधील सर्वच सदस्य जोरदार पार्टी करताना दिसले. शिव ठाकरे, साजिद खान आणि अब्दू रोजिक यांनी खास पार्टीचे आयोजन देखील केले होते. सतत मंडली चर्चेत असते. बऱ्याच वेळा मंडलीमधील सदस्य धमाल करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतात.
निम्रत काैर ही देखील मंडलीमध्ये महत्वाची सदस्य आहे. मात्र, मंडलीच्या अनेक पार्ट्यांमध्ये निम्रत काैर ही अनुपस्थित दिसते. इतकेच नाही तर मंडलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना देखील कधीच निम्रत काैर ही दिसत नाही. याच कारणामुळे निम्रत काैर ही अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.
मंडळीच्या पार्ट्यांमध्ये नसल्याने आणि फोटो वगैरे सोशल मीडियावर शेअर करत नसल्याने अनेकदा निम्रत काैर हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना होणाऱ्या ट्रोलिंगवर निम्रत काैर हिने मोठे भाष्य केले असून ट्रोलर्सवर भडकताना देखील निम्रत काैर ही दिसली आहे. निम्रत काैर म्हणाली की, मला नेहमीच मी कोणाला विश केले नाही किंवा पार्टीतील फोटो शेअर केले नाही म्हणून ट्रोल केले जाते. मात्र, हे सर्व बालिशपणा आहे.
मला माहिती आहे की, आमची मैत्री काय आहे. माझे बरेच मित्र मैत्रीण आहेत. मी कोणाचेही फोटो शेअर करत नाही. मी एखाद्या ठिकाणी जर उपस्थित नसेल तरीही मी माझ्या मित्रांसोबत नेहमीच असते. त्यावेळी मी ठिक नसेल किंवा बिझी देखील असून शकते ना. काही दिवसांपूर्वीच एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळाला होता. या अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप कले होते.