Bigg Boss 16 : अभिनेता सलमान खान याचा प्रसिद्ध रिऍलिटी शो बिग बॉसचा १६ वा सीझन आता अंतिम टप्प्यात आहे. शोचे टॉप ५ सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी कोण घेवून जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शोच्या टॉप ५ मध्ये स्वतःचं स्थान पक्क करणारा शालीन देखील दमदार स्पर्धकांपैकी एक आहे. पण आता बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शालीन याने कलाविश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी अनेक संकटांचा सामना केला. अनेक वर्ष अपयशाचा सामना केल्यानंतर शालीनला इंडस्ट्रीमध्ये काम मिळालं. सध्या शालीन त्याच्या खडतर प्रवासामुळे तुफान चर्चेत आहे.
शालीन याने बिग बॉसमध्ये त्याच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितलं आहे. नुकताच झेलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्यांने पैसे कमावण्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल सांगितलं. शालीन जेव्हा मुंबईमध्ये आला, तेव्हा तो एका मोबाईलच्या दुकानात काम करत होता. तेव्हा इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे शालीनला दुकान मालक प्रचंड ओरडला.
शालीन याने सांगितल्यानुसार; अभिनेत्याचं फक्त १२ वी पर्यंत शिक्षण झालं आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे अभिनेत्याला पदवीपर्यंत शिक्षण घेता आलं नाही. मुंबई अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी घेवून आलेल्या शालीन याने पैसे कमावण्यासाठी लोखंडवाला येथील मोबाईल शॉपमध्ये काम केलं. मात्र शालीनने ग्राहकाशी चुकीचे इंग्रजी बोलल्याने दुकान मालकाने अभिनेत्याचा अपमान केला.
मुंबईमध्ये आल्यानंतर आणि अनेक गोष्टींचा सामना केल्यानंतर अखेर शालीन याने स्वतःचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. शालिन याने त्याच्या करियरची सुरुवात रोडीजच्या सीजन २ पासून केली. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. रोडीडनंतर शालीन याने ‘सात फेरे: सलोनी का सफर’, ‘काजल’, ‘गृहस्थी’, ‘राम सिया के लव कुश’, ‘सूर्यपुत्र कर्ण’, ‘कुलवधू’, ‘नागिन 4′,’ दो हंसों का जोड़ा’ आणि ‘नच बलिए’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या भेटीस आलेला शालीन आता बिग बॉसमधून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सिजन प्रमाणे यंदाच्या सिजनमध्ये देखील अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. दमदार स्पर्धक सुंबुल तौकीर आणि निमृत कौर शोमधून बाहेर गेल्या आहेत. शालीन भनोट, प्रियंका चाहर चौधरी, अर्चना गौतम, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे बिग बॉसचे टॉप ५ स्पर्धक आहेत. रिपोर्टनुसार १२ फेब्रुवारी रोजी बिग बॉस १६ चा विजेता समोर येईल..