Bigg Boss 16 : शिव ठाकरे याच्या खोलीमधील ‘त्या’ गोष्टीबद्दल आईने सांगितलं सत्य

| Updated on: Feb 12, 2023 | 7:47 AM

Bigg Boss 16 : शिव ठाकरे याच्या आयुष्यातील मोठं सत्य अखेर आईने सांगितलंच... शिवाय, शिवच्या आई - बाबांनी शिवला विजयी करण्यासाठी चाहत्यांकडे आवाहन देखील केलं आहे.

Bigg Boss 16 : शिव ठाकरे याच्या खोलीमधील त्या गोष्टीबद्दल आईने सांगितलं सत्य
Follow us on

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) चा फिनाले आज म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. शोच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत शिव ठाकरे (shiv thakare), एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भनोट आणि अर्चना गौतम यांनी आपलं स्ठान कायम ठेवलं. त्यामुळे आज कोणता स्पर्धक बिग बॉस १६ ची ट्रॉफी घेवून जाणार… हे कळणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पाोहोचली आहे. याचदरम्यान शिव ठाकरे तुफान चर्चेत आला आहे. शिवच्या आई – बाबांनी शिवला विजयी करण्यासाठी चाहत्यांकडे आवाहन केलं आहे. शिवाय शिव याच्या आईने मुलाच्या कठीण दिवसांबद्दल देखील सांगितलं आहे. सध्या सर्वत्र शिवची चर्चा रंगली आहे.

शिव ठाकरेची बहीण मनिषा ठाकरे म्हणाली, एका टास्कदरम्यान शिवच्या डेळ्यात इन्फेक्शन झालं होते. तेव्हा शिवची आई प्रचंड रडली होती. या टास्कमध्ये अर्चना गौतम हिने शिव ठाकरेवर निशाना साधला होता. तेव्हा शिव ठाकरे याच्या आईला प्रचंड वाईट वाटलं होतं. पण आता शिव ठाकरेची प्रकृची स्थिर आहे. एवढंच नाही तर, शिव फिनालेमध्ये परफॉर्मेंस देखील सादर करणार आहे.

बिग बॉस १६ फिनालेमध्ये सर्व स्पर्धक पुन्हा एकत्र दिसणार आहेत. यावेळी शिव त्याच्या मंडळींना पुन्हा भेटू शकणार आहे. शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, सुंबुल तौकीर खान आणि निमृत कौर अहलूवालिया यांच्या ग्रुपला बिग बॉसच्या घरात मंडळी असं नाव देण्यात आलं होतं. आता सर्वांचं लक्ष बिग बॉस १६ च्या फिनालेकडे लागलं आहे. (bigg boss 16 today full episode youtube)

यावेळी शिवच्या आईने देखील शिव ठाकरे याचं मोठं सत्य ‘Tv9’ ला सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, ‘बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी शिवने प्रचंड मेहनत केली. शिवने त्याच्या खोलीमध्ये लिहून ठेवलं होतं आणि रोज सकाळी उठून तेच पाहायचा. त्याच्या प्रवास सोपा नव्हता. आता बिग बॉसची ट्रॉफी शिव ठाकरे याच्या नावावर झालीच पाहिजे…’ अशी भावना शिव ठाकरे यांच्या आईंनी व्यक्त केली.

बिग बॉसने केलं शिव ठाकरे याचं कौतुक

शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द बिग बॉस यांनी शिव ठाकरे याचं कौतुक केलं आहे. ज्यामुळे शिव प्रचंड भावुक झाला आणि ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तू दाखवून दिलं आहेस. असं देखील बिग बॉस म्हणाले. (shiv thakare instagram)