मुंबई : बिग बॉस 16 चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. एकीकडे स्टॅन विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करतोय. तर दुसरीकडे बिग बॉसमधील माजी स्पर्धक आणि त्याचा मित्र अब्दु रोझिक विविध आरोप करत आहे. यादरम्यान आता स्टॅनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन गर्दीत कोणाला तरी मारण्यासाठी धावतो, मात्र त्याला मध्येच थांबवलं जातं. त्याचं हे वागणं पाहून चाहतेसुद्धा थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की एमसी स्टॅन स्वत:ला नियंत्रित करू शकत नाही आणि तो गर्दीत एका व्यक्तीला मारण्यासाठी धावतो. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूला असलेले सुरक्षारक्षक त्याला तसं करण्यापासून थांबवतात. तेव्हा तो थांबतो, मात्र त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट पहायला मिळत आहे. एमसी स्टॅनचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
Mc stan physical fight in an event. I have to say one thing he is humble guy that we know
But he is young .
Stan have to calm Patience ignore negativity …#HaqSeMandali #MCStanArmy #BiggBoss16 #MCStanConcert #AbduRozik pic.twitter.com/2fYWUWE4qv— Om agnihotri (@Omagnihotri7) March 22, 2023
स्टॅनचा हा व्हिडीओ त्याच्या नुकत्याच पार पडलेल्या एका कॉन्सर्टमधील असल्याचं म्हटलं जात आहे. 18 मार्च रोजी नागपूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. याच कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप त्याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही.
17 मार्च रोजी एमसी स्टॅन इंदौरमध्ये कॉन्सर्ट करणार होता. मात्र हा कॉन्सर्ट सुरू होण्याच्या काही तास आधीच रद्द करण्यात आला. करणी सेनेच्या सदस्यांनी कॉन्सर्टच्या ठिकाणी जाऊन जोरदार हंगामा केला होता आणि स्टॅनला धमकी दिली होती. एमसी स्टॅनच्या गाण्यांमधील आणि रॅपमधील आक्षेपार्ह शब्द किंवा शिवीगाळचा वापर यावर त्यांना आक्षेप होता. म्हणूनच त्यांनी त्याचा शो होऊ दिला नाही.
दुसरीकडे स्टॅनचा अब्दु रोझिकशीही वाद टोकाला गेला आहे. अब्दुने एमसी स्टॅनच्या शोला हजेरी लावून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा त्याच्या मॅनेजरकडे व्यक्त केली होती. मात्र अब्दुने शोच्या ठिकाणी राहू नये, अशी स्टॅनची इच्छा असल्याचं सेक्युरिटी टीम आणि आयोजकांनी सांगितलं. स्टॅनच्या टीमकडून काहीतरी गैरसमज झाला असावा असं समजून अब्दु त्याठिकाणी सामान्य पाहुण्याप्रमाणे तिकिट विकत घेऊन गेला होता. मात्र एमसी स्टॅनच्या मॅनेजमेंट टीमकडून अब्दुला अत्यंत वाईट वागणूक मिळाली. त्यांनी अपशब्द वापरले आणि अब्दुच्या कारचंही नुकसान केलं, असा आरोप सोशल मीडियावरील पोस्टद्वारे करण्यात आला. ही पोस्ट अब्दुच्या टीमकडून पोस्ट करण्यात आली आहे.