Bigg Boss फेम एमसी स्टॅन याला शिवीगाळ, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, सर्वत्र खळबळ

| Updated on: Jan 14, 2024 | 9:59 AM

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 16' विजेता एमसी स्टॅन याला भररस्त्यात शिवीगाळ... व्हिडीओ समोर येताच सर्वत्र खळबळ... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाले..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एमसी स्टॅन याची चर्चा...

Bigg Boss फेम एमसी स्टॅन याला शिवीगाळ, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, सर्वत्र खळबळ
Follow us on

मुंबई | 14 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान होस्टेड रिऍलिटी शो ‘बिग बॉस 17’ सध्या तुफान चर्चेत असताना ‘बिग बॉस 16’ शोचा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर एमसी स्टॅन याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे… व्हिडीओमध्ये लाल रंगाच्या रेंड रोव्हर कारच्या शेजारी एक व्यक्ती व्हिडीओ शूट करत आहे. व्हिडीओमध्ये  गाडीत बसलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

कारमध्ये बसलेल्या व्यक्ती एमसी स्टॅन असल्याचं सांगितलं जात आहे. अखेर एमसी स्टॅन कारमधून बाहेर येतो आणि फोन खेचून घेतो…. व्हिडीओमागचं सत्य अद्याप समोर आलेलं नाही. पण व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एमसी स्टॅन याची चर्चा रंगली आहे. एमसी स्टॅन याच्याबद्दल सांगयचं झालं तर, ‘बिग बॉस’ मुळे एमसी स्टॅन प्रसिद्धी झोतात आहे. आज एमसी स्टॅन याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एमसी स्टॅन याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.

एमसी स्टॅन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील एमसी स्टॅन याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एमसी स्टॅन कायम सोशल मीडियावर स्वतःच्या रॅप सॉन्गचे व्हिडीओ पोस्ट करत असते. एमसी स्टॅन याच्या प्रत्येक व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असते.

एमसी स्टॅन मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात एमसी स्टॅन एका बस्तीमध्ये राहायचा. त्याच्या आयुष्यात अनेक वाद होते. एमसी स्टॅन याच्या गाण्यांमुळे देखील अनेक वाद रंगले. पण बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन 80 हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली. सलमान खान देखील एमसी स्टॅन याच्या महागड्या वस्तूंवर वक्तव्य करायचा…