मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात काही दिवसांपूर्वी मुनव्वर फारुकी हा धमाकेदार गेम खेळताना दिसला. विशेष म्हणजे मुनव्वर फारुकी हाच बिग बॉस 17 चा विजेता होणार अशी तूफान चर्चा देखील रंगताना दिसली. मात्र, बिग बॉस 17 च्य घरात मुनव्वर फारुकी याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान ही दाखल झाली आणि कुठेतरी मुनव्वरचा गेम खराब झाल्याचे बघायला मिळाले. आयशा खान ही घरात दाखल होताच तिने मुनव्वर फारुकी याच्यावर गंभीर आरोप केले. फक्त आरोपच नाही तर मुनव्वर फारुकी याने आपल्याला कशाप्रकारे धोका दिला हे देखील आयशा खान हिच्याकडून सांगण्यात आले.
आयशा खान ही सतत मुनव्वर फारुकीवर आरोप करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर आयशा खान हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांनी आता आयशा खान हिला तूफान ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. हेच नाही तर काही लोकांनी हिला खडेबोल सुनावले आहेत. आता या व्हिडीओमुळे आयशा ही वादात सापडलीये.
आयशा खान हिची एक मुलाखत व्हायरल होताना दिसतंय. या मुलाखतीमध्ये आयशा खान हिला विचारले की, शाहरूख खान याला एखाद्या मेसेज सांगायचा असेल तर काय सांगशील? अगोदर तर जोरात ओरडताना आयशा खान ही दिसत आहे. आयशा म्हणते की, I Love U..प्लीज माझ्यासोबत लग्न कर…त्यानंतर आयशा खान हिला सांगितले गेले की, त्याचे अगोदरच लग्न झाले आहे.
यावर थेट आयशा खान म्हणाली की, मला काहीच समस्या नाहीये…आमच्याकडे असे पण चार लग्न चालतात…आता आयशा खान हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यावरूनच लोक हे आयशा खान हिला खडेबोल हे सुनावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
अनेकांनी आयशा खान हिच्या व्हिडीओवर कमेंट करून लिहिले की, मुनव्वर फारुकीच्या दोन गर्लफ्रेंड तुला चालत नाहीत. मग चार लग्न कसे चालतात? दुसऱ्याने लिहिले की, अरे लग्न झालेल्या व्यक्तीसोबत ही लग्न करण्याचा विचार करते आणि मला काही समस्या नाही म्हणते तिथेच कळते की, ही आयशा कशी आहे. आता सोशल मीडियावर लोक सतत आयशा खान हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.