मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये आतापर्यंत मोठे भांडणे, वादविवाद आणि कुठेतरी प्रेम बघायला मिळतंय. फुटेज मिळवणाच्या चक्करमध्ये घरातील सदस्यांनी बिग बॉस 17 च्या घराची वाट लावल्याचे बघायला मिळतंय. यामुळेच आता बिग बॉस 17 चे निर्माते हे घरातील सदस्यांवर चांगलेच भडकल्याचे बघायला मिळतंय. सोशल मीडियावर एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये बिग बॉस हे घरातील सदस्यांना काही फोटो हे दाखवताना दिसत आहेत. बिग बॉस 17 च्या घरात मोठी घाण ही सदस्यांकडून करण्यात आलीये.
बिग बॉस 17 कडून किचन, बेडरूम, हाॅल, बाथरूम आणि इतर परिसरातील काही फोटो दाखवण्यात आले. या फोटोंमध्ये बिग बॉस 17 चे घर घाण केल्याचे स्पष्ट दिसतंय. किचनमध्ये खूप सारा कचरा दिसतोय. दुसरीकडे बेडरूममध्येही कपड्यांची घाण दिसत आहे. हेच फोटो बिग बॉस 17 च्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना दाखवण्यात आले.
हे फोटो पाहून बिग बॉस 17 च्या घरातील सदस्य हे बिग बॉसला साॅरी म्हणताना दिसत आहेत. मात्र, बिग बॉस 17 चे निर्माते हे याबद्दल घरातील सदस्यांना चांगलीच शिक्षा देण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, काही लोक हे बिग बॉस 17 च्या घरात मोठा बाॅक्स घेऊन दाखल झाले आहेत. यांच्या हातामध्ये साफसफाई करण्याचे साहित्य देखील दिसत आहे.
इतकेच नाही तर थेट बिग बॉस 17 च्या घरातील साहित्य देखील या लोकांकडून जप्त केले जातंय. घरातील काही सदस्य हे आपल्या वस्तू घेऊन जाताना दिसत आहेत. आपले साहित्य जप्त होण्यापासून वाचवण्यासाठी घरातील सदस्य धावपळ करताना दिसत आहेत. हा प्रोमोचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, बिग बॉस 17 च्या निर्मात्यांचे हे रूप पाहून घरातील सदस्य हैराण झाले आहेत.
बिग बॉस 17 च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये धमाका होणार हे नक्कीच दिसतंय. बिग बॉस आता घरातील सदस्यांना नेमकी काय शिक्षा देतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. नुकताच बिग बॉस 17 च्या घरात विकी जैन आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसले. हेच नाही तर थेट गंभीर आरोप करताना दोघेही दिसले. मुळात म्हणजे अंकिता लोखंडे हिला अभिषेक कुमार आवडत नाही.