मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींसोबतच युट्यूबर्ससुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरातील वातावरण चर्चेत राहिलं आहे. बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या सर्व 17 स्पर्धकांपैकी अंकिता लोखंडेची लोकप्रियता अधिक असल्याने तिला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अंकिताला बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राच्या चुलत बहिणीने मागे टाकलं आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांना किती मानधन मिळतंय, ते जाणून घेऊयात..
बिग बॉससाठी मन्नारा चोप्रा ही अंकितापेक्षा जास्त मानधन स्वीकारतेय. तिला एका आठवड्यासाठी 15 लाख रुपये मिळत आहेत. अंकिताच्या मानधनापेक्षा ही रक्कम तीन लाखांनी जास्त आहे. अंकिता ही बिग बॉसमधील दुसरी सर्वांत महागडी स्पर्धक ठरली आहे. एका आठवड्यासाठी तिला 12 लाख रुपये फी मिळतेय. तर तिचा पती विकी जैनला एका आठवड्यासाठी 5 लाख रुपये दिले जात आहेत.
‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे बिग बॉसमध्ये विशेष चर्चेत आहेत. ऐश्वर्याचीही प्रचंड लोकप्रियता आहे. याआधी तिने खतरों के खिलाडी या शोमधूनही विशेष छाप सोडली होती. आता बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी तिला 12 लाख रुपये आणि पती नील भट्टला 7 लाख रुपये फी मिळत आहे. माजी क्राइम रिपोर्टर जिग्ना वोराला बिग बॉससाठी 7 लाख रुपये दिले जात आहेत. तर युट्यूबर अनुराग डोबाल याला साडेसात लाख रुपये मिळत आहेत.
कॉमेडियन मुनव्वर फारुखीला सात लाख रुपये फी मिळत आहे. तर एक्स कपल ईशा मालवीय आणि अभिषेक कुमारसुद्धा पहिल्या एपिसोडपासून चर्चेत आहेत. ईशाला तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेकपेक्षा जास्त मानधन मिळतंय. तिला एका आठवड्यासाठी 7 लाख रुपये आणि अभिषेकला 5 लाख रुपये मिळत आहेत. टीव्हीवर प्रसिद्ध चेहरा रिंकू धवनला वकील सना रईस खानपेक्षा कमी मानधन मिळतंय. रिंकूला एका आठवड्यासाठी 4 लाख आणि सनाला 6 लाख रुपये दिले जात आहेत.
सोनिया बंसल- एका आठवड्याला 7 लाख रुपये
नावेद- एका आठवड्याला 4 लाख रुपये
फिरोजा खान- एका आठवड्याला 3 लाख रुपये
सनी आर्या- एका आठवड्याला 3.5 लाख रुपये
अरुण मैशेट्टी- एका आठवड्याला 2 ते 4 लाख रुपये