मुंबई | 16 मार्च 2024 : ‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. अभिनेत्रीचा रुग्णालयातील फोटो समोर आल्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या प्रकृतीची चर्चा होत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्री आयेशा खान आहे.
आयेशा खान हिला अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 17’ शोमुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. शो संपल्यानंतर आयेशा तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली. बिग बॉसमध्ये देखील अभिनेत्री अनेकदा बेशुद्ध झाली होती. आता पुन्हा आयेशा खान हिची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आयेशा खान हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली दिली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयातील एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हाताला आयव्ही ड्रिप दिसत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘आपण याठिकाणी पुन्हा आलो…’
आयेशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉसमध्ये आयेशा मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) याचं पितळ उघडं करण्यासाठी आली होती. मुनव्वर याने दोन वेळा फसवणूक केल्याचे आरोप आयेशा हिने लावले होते. शोमधील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
आयशा खान सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. बालकलाकार म्हणून तिने करिअरला सुरुवात केली. सध्या ती साऊथ सिनेमांमध्ये सक्रिय आहे. लवकरच आयेशा दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता दुल्कर सलमान खानसोबत ‘लकी भास्कर’ या सिनेमात दिसणार आहे. सध्या सर्वत्र आयेशा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.