Bigg Boss 17 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ शोची चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस 17’चा विजेता कोण असेल… या प्रतीक्षेत आता चाहते आहे. लवकरच ‘बिग बॉस 17’ शोच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. एवढंच नाही तर, ‘बिग बॉस 17’ मधील स्पर्धकांच्या चर्चा देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘बिग बॉस 17’मध्ये सामिल झालेल्या स्पर्धकांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर अभिनेत्री शहनाज गिल देखील सेलिब्रिटी झाली. असंच काही मुन्नवर फारुकी याच्यासोबत देखील झालं आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर एका रात्रीत मुन्नवर फारुकी याच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शोमध्ये आल्यानंतर मुन्नवर फारुकी याच्या इन्स्टाग्राम फॉलोअरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. फक्त मुन्नवर नाही तर, अन्य स्पर्धकांच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे.
कॉमेडियन-संगीतकार मुनावर फारुकी याने शोमध्ये अडचणी आणि अनेक संकटांचा सामना केला आहे. मात्र, चाहत्यांना त्याची कविता, गेम आणि शांत वृत्ती आवडते. इंस्टाग्रामवर त्याचे 10.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
टेलिव्हिजन आणि फिल्म स्टार अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’ 17 मधील एक दमदार स्पर्धक आहे. शोमुळे अंकिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण बिग बॉसनंतर अंकिता हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर अंकिता हिते फॉलोअर्स 4.7 मिलियनवर पोहोचलेआहेत…
टीव्ही अभिनेता अभिषेक कुमारचा ‘बिग बॉस’ 17 मधील प्रवास विविध चढउतारांसह मनोरंजक राहिला आहे. टॉप सिक्समध्ये स्थान मिळवल्यानंतर अभिषेकचे इंस्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. सर्वत्र अभिषेक याची चर्चा देखील रंगलेली असते.
अभिनेत्री, मॉडेल आणि YouTuber मन्नारा चोप्राने ‘बिग बॉस’ 17 मध्ये पदार्पण केल्यापासून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घरामध्ये प्रवेश करणारी आणि कन्फेशन रूममध्ये जाणारी पहिली स्पर्धक म्हणून मन्नरा हिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवर मन्नरा हिचे 2.7 दशलक्ष फॉलोअर्ससह आहेत.
लोकप्रिय गेमर आणि YouTuber अरुण श्रीकांत माशेट्टी याने ‘बिग बॉस’ 17 मध्ये पहिल्या चार फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.