मुंबई | 18 जानेवारी 2024 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ ची चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे सतत वाद होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांच्या रोमान्सची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. दोघांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं. आता समर्थ याने ईशा हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल आणि व्हायरल व्हिडीओबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच समर्थ ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर झाला आहे. शोमधून बाहेर आल्यानंतर समर्थ याने दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. ईशा हिच्याबद्दल समर्थ म्हणाला, ‘ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. मला नाही वाटत यामध्ये काही चुकीचं आहे. एकापेक्षा जास्त मुलींसोबत तर नाही ना मी काहीही करत…’
‘मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत होतो. मी माझ्या गर्लफ्रेंडला हग आणि किस केलं.. जर तुम्ही प्रेम करत असाल तर, हे एक माध्यम आहे असलेलं प्रेम व्यक्त करण्याचं. मी शोमध्ये आणि शोच्या बाहेर देखील रियल आहे. मी कधीही खोटं वागलो नाही…’ असं देखील समर्थ म्हणाला…
पुढे समर्थ म्हणाला, ‘एलिमिनेशन झालं त्यावर मी आनंदी नाही. कारण मला विजयी व्हायचं होतं. बिग बॉसमध्ये चांगले क्षण अनुभवले.’ एवढंच नाही तर, समर्थ याने अभिषेक याच्यासोबत झालेल्या भांडणावर देखील स्पष्टीकरण दिलं आहे. समर्थ म्हणाला, ‘माझी चुकी होती मी मान्य करतो. त्याची देखील चुकी होती. मी त्याला बोललो, माझी राग त्याच्यावर काढला कारण त्याची वागणूकच तशी होती…’
‘ईशा हिला तो वाईट म्हणाला आणि ही गोष्ट मी कधीच विसरु शकत नाही… लोकं अनेक वर्षांनंतर देखील राग विसरत नाहीत. असं असताना चार आठवड्यात मी कसं विसरु…’ असं देखील समर्थ म्हणाला… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समर्थ याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.