मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मधून तहलका याला बाहेर काढण्यात आले. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य हे ढसाढसा रडताना दिसत आहेत. इतकेच नाही तर तर अभिषेक कुमार हा देखील रडताना दिसतोय. आता जवळपास हे स्पष्ट आहे की, तहलका हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडतोय. एक वाद तहलका याच्या चांगलाच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 च्या घरात मोठा नाटक बघायला मिळतंय. याचे काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
बिग बॉस 17 मध्ये अभिषेक कुमार आणि तहलका यांच्यामध्ये वाद झाला. अभिषेक कुमार याने तहलका याच्यासोबत भांडण्यास सुरूवात केली. त्यानंतर थेट रागामध्ये तहलका याने अभिषेक कुमार याचे शर्ट पकडले. यानंतर घरातील सर्व सदस्यांनी तहलका याच्याविरोधात मोर्चा वळवला. तहलका याच्यावर कारवाई करण्याची मागणी सतत करण्यात आली.
शेवटी आता तहलका याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. मात्र, तहलका हा घराच्या बाहेर पडत असतानाच सर्वचजण रडताना दिसत आहेत. तहलका याचा मित्र अरूण हा तर बिग बॉस 17 च्या निर्मात्यांची हात जोडून माफी मागताना दिसला. इतकेच नाही तर अभिषेक कुमार हा देखील रडताना दिसला.
Promo #BiggBoss17 #Tehelka Evicted from BiggBoss17 for breaking rules pic.twitter.com/raHOB3Lt2U
— The Khabri (@TheKhabriTweets) December 1, 2023
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी अभिषेक कुमार याच्या रडण्याला फेक म्हटले आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हा अभिषेक फार जास्त नाटकी आहे. असा दाखवत आहे की, त्याला फार जास्त दु:ख झाले.
तहलका हा बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. तहलका याची या भांडणामध्ये चुक नसल्याचे त्याचे चाहते सांगताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी तहलका याला परत एकदा बिग बॉस 17 च्या घरात घ्यावे असे म्हटले आहे. आता तहलका हा परत बिग बॉस 17 मध्ये दाखल होतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.