Bigg Boss 17 : अंकिताला सासूने नको ते सुनावलं; पती विकी जैनने का नाही घेतली पत्नीची बाजू?

| Updated on: Jan 14, 2024 | 1:02 PM

Bigg Boss 17 : अंकिताला सासूने नको ते सुनावल्यानंतर देखील विकी जैन पत्नीला देतोय दोष? का नाही घेत पत्नीची बाजू? व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल... सर्वत्र विकी आणि अंकिता यांच्या नात्याची चर्चा...

Bigg Boss 17 : अंकिताला सासूने नको ते सुनावलं; पती विकी जैनने का नाही घेतली पत्नीची बाजू?
Follow us on

मुंबई | 14 जानेवारी 2024 : चाहते आता ‘बिग बॉस 17’ शोच्या विकेंड का वारच्या प्रतीक्षेत आहे. फॅमिली विक दरम्यान जे काही झालं… त्यावर येणारा विकेंड का वार आधारित असणार आहे. सर्वत आधी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार आहेत. विकी याच्या आईने अंकिता हिला अनेक गोष्टींसाठी जबाबदार ठरवलं आहे. एवढंच नाही तर, विकी याने देखील सर्व दोष तुझाच आहे… असं पत्नी अंकिला हिला समजावून सांगितलं आहे. ज्यामुळे चाहत्यांनी आणि होस्ट करण जोहर याने विकी याच्यावर निशाणा साधला आहे…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये करण, विकी याला सुनावताना दिसत आहे. करण म्हणतो, ‘तुझी आई येऊन सर्वांसमोर अंकिता हिला प्रश्न विचारते, तेव्हा पती म्हणून तुला अंकितासोबत उभं राहायला हवं होतं… तुला तुझ्या आई विरोधात बोलायला कोणी सांगत नाही… पण तू अंकिता हिला विचारायला हवं की, ‘अंकिता काय झालं आहे?’

हे सुद्धा वाचा

 

करण याच्या वक्तव्यानंतर विकी अंकिता हिला विचारतो काय झालं? तेव्हा अंकिता म्हणते, ‘तुझ्या वडिलांनी माझ्या आईला फोन केला आणि म्हणाले, ‘तुम्ही देखील तुमच्या पतीला चप्पल फेकून मारायच्या का…’ यावर विकी म्हणतो, ‘तुझे वडील काय म्हणाले असते? एका वडिलांच्या मनात अशा भावना येऊ शकतात…’

पुढे विकी म्हणतो, ‘अंकिता तू स्वतःच्या कोणत्याच गोष्टी सांभाळू शकत नाही आणि त्या सर्व गोष्टी तू माझ्यापर्यंत अशा प्रकारे घेवून येते, ज्या नॅशनल टीव्हीवर योग्य दिसत नाहीत… या सर्व गोष्टी कधी समजून घेशील?’ अंकिता आणि विकी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंकिता हिला सासू रंजना जैन काय म्हणाल्या…

अंकिता हिच्या सासूबाई फॅमिली विकमध्ये म्हणाल्या, ‘प्रत्येक एपिसोडमध्ये फक्त आणि फक्त घाणेरड्या गोष्टी… आम्ही कसं सहण करायचं हे सगळं… जेव्हा तू विकीला लाथ मारलीस तेव्हा तुझ्या सासऱ्यांनी तुझ्या आईला फोन केला आणि म्हणाले, ‘तुम्ही देखील तुमच्या पतीसोबत असेच वागत होत्या का…’ यावर अंकिता हिने सासरे आणि कुटुंबियांची माफी देखील मागितली.