मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठा हंगामा होतोय. नुकताच अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. यावेळी ऐश्वर्या ही अंकिताला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहे. आज बिग बॉस 17 मध्ये विकेंडचा वार हा पार पडणार आहे. आज एक सदस्य घराला कायमचे अलविदा करून जाताना दिसणार आहे.
या आठवड्यात नाॅमिनेशनमध्ये समर्थ, मनसवी, ईशा मालवीय, अरुण माशेट्टी, विक्की जैन आणि सना रईस खान हे आहेत. यांच्यापैकी नेमके कोण घराबाहेर पडणार यावर जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. अनेकांना वाटते की, यावेळी सना रईस खान ही बिग बॉस 17 मधून बाहेर पडेल. मात्र, यावेळी अत्यंत धक्कादायक नाॅमिनेशन होताना दिसणार आहे.
रिपोर्टनुसार यावेळी बिग बॉस 17 मधून मनसवी ही बाहेर पडणार आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसणार आहे. यावेळी ईशा हिला खडेबोल सुनावताना सलमान खान हा दिसणार आहे. सलमान खान हा फक्त ईशाच नाही तर समर्थ आणि अभिषेक यांना देखील खडेबोल सुनावताना दिसणार आहे.
Exclusive #WeekendKaVaar.
Rumours say #ManasviMamgai is eliminated from the house instead of #SanaKhan
— The Khabri (@TheKhabriTweets) November 2, 2023
बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय. बिग बॉस 17 मधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून ईशा हिचे नाव चर्चेत आहे. आता ईशा हिच्या पर्सनल लाईफबद्दल देखील काही मोठे खुलासे होताना दिसत आहेत. यावरून नेहमीच ईशा हिच्यावर टिका देखील केली जाते.
काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही चक्क पती विकी जैन याच्याबद्दल धक्कादायक विधान करताना दिसली. थेट विकी जैन याला अंकिता हिने किडा म्हटले. नेहमीच बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद हे होताना दिसतात. अंकिता लोखंडे हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये काम केले आहे.