मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : ‘बिग बॉस 17’ शोचा विजेता मुनव्वर फारुकी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर फारुकी याची चर्चा रंगली आहे. मुनवर फारुकी गंभीर आरोपाखाली तुरुंगातून सुटल्याच्या घोटाळ्यातून थोडक्यात बचावला. या गोष्टीला तीन वर्ष झाली आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमात हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. इंदूर मध्यवर्ती कारागृहात 35 दिवसांची शिक्षा भोगल्यानंतर 6 फेब्रुवारी 2021 रोजी त्याची सुटका करण्यात आली.
अंतरिम जामिनाची मागणी केल्यानंतर मुनव्वर फारुकी याची सुटका झाली. दरम्यान, न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यास त्यास आव्हान दिले जाऊ शकते. मुनावर फारुकी प्रकरणी तुकोगंज पोलीस ठाण्यात आरोपपत्र दाखल करणे अपेक्षित होते, मात्र त्यास विलंब झाला.
तुकोगंज पोलीस ठाणे प्रभारी जितेंद्र सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘याप्रकरणी आमची चौकशी सुरु आहे आणि अद्याप न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेलं नाही…’ त्याच रिपोर्टनुसार, अभियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मध्य प्रदेश सरकारच्या परवानगीनंतर मुनव्वर त्याच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याची चर्चा रंगली आहे.
भारतीय संहितेनुसार, ‘जो कोणी, भारतातील कोणत्याही वर्गाच्या नागरिकांच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याच्या उद्देशाने, शाब्दिक, लिखीत किंवा संकेतांनी अपमान करत असेल किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करतो त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो…
‘बिग बॉस 17’ ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर याच्यासाठी डोंगरी याठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मुनव्वर याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. या क्षणाचे सीन्स कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी डोंगरी याठिकाणी ड्रोनचा बेकायदेशीर वापर करण्यात आला होता. म्हणून मुनव्वर याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.
मुनव्वर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, मुनव्वर त्याच्या विनोदबुद्धीमुळे प्रसिद्धीझोतात आला. मुनव्वर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील मुनव्वर याला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मुनव्वर फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. मुनव्वर याला एक मुलगा दोखील आहे. बिग बॉसचा विजेता ठरल्यामुळे मुनव्वर याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये वाठ झाली आहे.