Bigg Boss 18 च्या घरात गाढवाची एन्ट्री, ‘या’ स्पर्धकासोबत ‘बिग बॉस’मध्ये दिसणार गाढव

| Updated on: Oct 06, 2024 | 1:56 PM

Bigg Boss 18: 'बिग बॉस 18' मध्ये स्पर्धकांसोबत होणार प्राण्यांची एन्टी? गाढवाच्या एन्ट्रीमुळे चर्चांना उधाण, 'या' स्पर्धकासोबत 'बिग बॉस'मध्ये दिसणार गाढव, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हायरल व्हिडीओची चर्चा...

Bigg Boss 18 च्या घरात गाढवाची एन्ट्री, या स्पर्धकासोबत बिग बॉसमध्ये दिसणार गाढव
Follow us on

‘बिग बॉस मराठी 5’ शो रविवारी संपत आहे, तर दुसरीकडे ‘बिग बॉस 18’ चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. रविवारी म्हणजे 6 ऑक्टोबर पासून अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 18’ शोची सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ शो सोबतच ‘बिग बॉस 18’ शोची देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस 18’ मधील स्पर्धकांची नावे आता हळू – हळू समोर येत आहेत. पण शोमध्ये एन्ट्री केलेल्या गाढवाने सर्वांचं मन जिंकलं आहे.

सांगायचं झालं तर, कलर्स वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या गाढवाला पाहून चाहते देखील चकित झाले आहेत. बिग बॉसच्या स्टेजवर गाढवाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. ‘बिग बॉस 18’ मध्ये प्राण्यांची काय भूमिका असेल? असा प्रश्न देखील चाहते उपस्थित करत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

सध्या सर्वत्र ‘बिग बॉस 18’ मध्ये दिसणाऱ्या गाढवाची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, प्रोमोमध्ये दिसणाऱ्या गाढवाचं नाव मॅक्स असं आहे. प्रोमोमध्ये दिसणार गाढव दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर, ॲड. गुणरत्न सदावर्तें यांचा आहे. बिग बॉसच्या घरात ॲड. गुणरत्न सदावर्तें यांच्यासोबत त्यांचा गाढव देखील राहणार आहे.

सांगायचं झालं तर, ॲड. गुणरत्न सदावर्तें यांचा गाढव शोमध्ये राहणार आहे की नाही… याबद्दल निर्मात्यांकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण चित्र लवकरच स्पष्ट होईल… दरम्यान, ॲड. गुणरत्न सदावर्तें यांचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड प्रिमियरला चारा खाताना दाखवण्यात आलं होतं.

ॲड. गुणरत्न सदावर्तें यांचा ‘बिग बॉस 18’ मध्ये एन्ट्री करताना व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. “हम आते हैं डाकू की खानदान से” म्हणत गुणरत्न सदावर्ते एन्ट्री करताना दिसत आहेत. तर सदावर्तेंनी एन्ट्री केल्यानंतर सलमान खान जोरजोरात हसू लागतो.