Bigg Boss 18 Grand Finale: टॉप 3 स्पर्धक, बक्षिसाची रक्कम, फिनालेची वेळ; जाणून घ्या सर्वकाही…

| Updated on: Jan 12, 2025 | 10:24 AM

'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय शो असून त्याचा अठरावा सिझन लवकरच संपुष्टात येणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक राहिले आहेत. त्यांच्यापैकी विजेतेपदावर नाव कोरण्यात कोण यशस्वी ठरतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bigg Boss 18 Grand Finale: टॉप 3 स्पर्धक, बक्षिसाची रक्कम, फिनालेची वेळ; जाणून घ्या सर्वकाही...
सलमान खान
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस’चा अठरावा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक असून त्यात करणवीर मेहरा, विवियन डिसेना, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, चाहत पांडे आणि रजल दलाल यांचा समावेश आहे. या आठ जणांमध्ये ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे. बिग बॉसचा हा नवीन सिझन 6 ऑक्टोबर 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिझनचा ग्रँड फिनाले कधी आणि किती वाजता पार पडणार, हा फिनाले प्रेक्षकांना कुठे पाहता येणार, विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम किती असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात..

‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले कधी?

येत्या 19 जानेवारी रोजी ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले कुठे पाहता येईल?

‘बिग बॉस 18’चे एपिसोड्स आणि ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर आणि जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ग्रँड फिनालेचा एपिसोड रात्री नऊ वाजल्यापासून सुरू होईल.

बक्षिसाची रक्कम किती?

‘बिग बॉस 18’च्या विजेत्याला बक्षिसाची रक्कम किती मिळेल याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र काही रिपोर्ट्सनुसार, ही रक्कम 50 लाख रुपये असल्याचं कळतंय. पण ग्रँड फिनालेच्या आधी जर ब्रीफकेस टास्क पार पडला आणि एखाद्या स्पर्धकाने ठराविक रक्कम घेऊन शो सोडण्याचा पर्याय निवडला, तर पन्नास लाखांची ही रक्कम कमी होऊ शकते. मग विजेत्याला 25 ते 30 लाख रुपये मिळू शकतात.

‘बिग बॉस 18’चे टॉप 3 स्पर्धक कोणते?

‘बिग बॉस’च्या फॅन क्लबनुसार, करणवीर मेहरा, विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा या तिघांमध्ये ट्रॉफीसाठी अंतिम चुरस रंगू शकतात. विजेता बनण्यासाठी हे तिघंही तितकेच पात्र असल्याच्या प्रेक्षकांच्या भावना आहेत. याशिवाय करण, विवियन, अविनाश, रजत दलाल आणि चुम दरांग हे पाच अंतिम स्पर्धक बिग बॉसच्या घरात टिकू शकतात. तर चाहत पांडे, ईशा सिंह आणि शिल्पा शिरोडकर हे विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर जाऊ शकतात.

‘बिग बॉस 18’चं शेवटचं एलिमिनेशन

ग्रँड फिनालेच्या एक आठवडा आधी बिग बॉसच्या घरातून श्रुतिका अर्जुन बाहेर पडली. प्रेक्षकांच्या मतदानानुसार तिला सर्वांत कमी मतं पडली होती. श्रुतिकाला रजत आणि चाहत यांच्यासोबत एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. टाइम-काऊंटिंग टास्कमध्ये पराभव झाल्यानंतर या तिघांना नॉमिनेट करण्यात आलं होतं.