‘बिग बॉस 18’ शोचा सेट तयार आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वातील घरात काही खास गोष्ट होती. यंदाच्या वर्षी देखील घरातील अनेक हटके बाजू प्रेक्षकांना दिसणार आहेत. गार्डन एरिया पासून ते जेल पर्यंत सर्वकाही विशेष थिम लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. सांगायचं झालं तर, रिऍलिटी शोचे सेट तयार करणारे डिझायनर ओमंग कुमार यांनी ‘बिग बॉस’च्या घराबद्दल अनेक नव्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ओमंग कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पूर्वी प्रमाणे यंदाच्या वर्षी घर वेगवेगळ्या रंगांनी संजलेलं नाही. ”टाइम का तांडव’ या थीमच्या आधारावर सेट तयार करण्यात आलं आहे. आम्ही असा सेट तयार केला आहे, ज्यामुळे जुन्या काळातील आठवणी ताज्या होतील… शिवाय स्पर्धकांमध्ये गोंधळ देखील निर्माण होईल. घरात काय आणि कसं होईल याबद्दल आम्ही काहीही सांगू शकत नाही. पण बिग बॉसचा अंदाज आता बदलला आहे.’
‘पूर्वी बिग बॉस म्हणायचे बिग बॉसला वाटत आहे की… पण आता बिग बॉसला माबिती आहे… म्हणजे भूतकाळात काय झालं आहे. वर्तमान कसं असेल आणि भविष्यात काय होणार? सर्व काही बिग बॉसला माहिती असणार आहे.’ घराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.
ओमंग कुमार म्हणाले, आम्ही बिग बॉसच्या घराला गुहा असलेलं हॉटेल बनवलं आहे. ही एक प्राचीन गुहा आहे, परंतु या सेटमध्ये पंचतारांकित रिसॉर्टच्या सर्व सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ, एका बाजूने पाहिल्यास, येथे आपण भूतकाळ तसेच भविष्य देखील पाहू शकतो. यंदाच्या वर्षी बिग बॉसच्या वेगळेपण असणार आहे.
बिग बॉसच्या घरातील जेल देखील वेगळ्या रुपात तयार करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी जेल किचन आणि बेडरुमच्या मध्ये असणार आहे. त्यामुळे स्पर्धक जेलकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. सुरुवातीला स्पर्धकांना घरात अवघडल्या सारखं होईल, कारण जागा पूर्वीपेक्षा वेगळी आणि हटके असणार आहे.