बिग बॉस ओटीटी 3 ने धमाका केला. विशेष म्हणजे यंदाचे हे सीजन करण जोहर याने होस्ट न करता बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी होस्ट केले. विशेष म्हणजे प्रेक्षकांना अनिल कपूर यांचा हा अंदाज जबरदस्त आवडलाय. मागील दोन सीजनचे रेकॉर्ड ब्रेक या सीजनने केले. घरात मोठे हंगामे होताना दिसले. मुळात म्हणजे हे सीजन अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींमुळे अगोदरपासूनच चर्चेत राहिले. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग असलेले मोठे दिग्गज या सीजनमध्ये सहभागी झाले. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता ठरली आहे.
सना मकबूलने बिग बॉस OTT 3 जिंकले असून अनिल कपूरने सनाच्या नावाची घोषणा केलीये.
🥁Drumrolls🥁
Our diva, Sana Makbul grabs the shining trophy for Bigg Boss OTT 3.
Congratulations @SANAKHAN_93 🎉 🥳🏆#BiggBossOTT3 #BBOTT3onJioCinema #BBOTT3 #BiggBoss #JioCinemaPremium pic.twitter.com/OuigmIfC5B— JioCinema (@JioCinema) August 2, 2024
सना मकबूल ‘बिग बॉस ओटीटी 3’ची विजेता झाली आहे.
सना आणि नेजी यांच्यापैकी एकजण बिग बॉसचा विजेता होणार आहे. अगदी थोड्याच वेळात अनिल कपूर बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा करतील.
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा धमाका होताना दिसतोय. आात नुकताच वोटिंग लाईन देखील बंद झाल्या आहेत.
बिग बॉस ओटीटीच्या विजेत्याच्या नावाची घोषणा लवकरच होणार आहे. विशेष म्हणजे सना मकबूल आणि नेजी हे टॉपमध्ये पोहोचले.
रणवीर शौरी बिग बॉस OTT 3 च्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर. चाहत्यांना बसला अत्यंत मोठा धक्का.
अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी केला धमाकेदार डान्स.
थोड्या वेळात होणार बिग बॉस ओटीटी 3 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा. अनिल कपूर हे करणार विजेत्याच्या नावाची घोषणा
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाचा अयान अग्निहोत्री हा बिग बॉस ओटीटी 3 च्या मंचावर पोहोचला आहे.
सना मकबूल हिचा बिग बॉस ओटीटीच्या मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स बघायला मिळाला.
सना मकबूल, रणवीर शौरी आणि नेजी हे बिग बॉस ओटीटी 3 च्या फायनलमध्ये पोहोचले आहेत.
कृतिका मलिक हिच्यानंतर आता साई केतन राव हा देखील विजेत्या पदाच्या रेसमधून बाहेर पडलाय.
बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेला सुरूवात झालीये. यावेळी रणवीर शाैरी यांनी सनावर मोठा निशाना साधला आहे. रणवीर शाैरी हा म्हणाला की, सना मकबूल ही बिग बॉसच्या कृपेमुळे घरात अजूनही टिकून आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बिग बॉसच्या घरात पोहोचली आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने घरातील सदस्यांना खास टास्क दिला आहे.
Stree ko mili eviction ki responsibility! Kaun hoga ghar se beghar’?
Watch the Grand Finale of #BiggBossOTT3, now streaming exclusively on JioCinema.@ShraddhaKapoor @RajkummarRao@RanvirShorey @SANAKHAN_93@NaezyOfficial70 @saiketanrao#BBOTT3onJioCinema #BBOTT3 #BiggBoss… pic.twitter.com/TrBvhqx6mu
— JioCinema (@JioCinema) August 2, 2024
सना मकबूल ही बिग बॉस ओटीटीची विजेता होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Kritika Malik hai pehli contestant to get evicted out of the top 5 finalists!#KritikaMalik #BiggBossOTT3 #BBOTT3onJioCinema #BBOTT3 #BiggBoss #JioCinemaPremium pic.twitter.com/n1fJ4h0mit
— JioCinema (@JioCinema) August 2, 2024
अखेर सना मकबूल हिने रणवीर शाैरीची माफी मागितली आहे.
रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजी हे बिग बॉस ओटीटी 3 चे टॉप फायनलिस्ट आहेत.
बिग बॉस ओटीटी 3 मधून कृतिका मलिक हिचा प्रवास संपला आहे. फायनलिस्टमधून कृतिका मलिक ही बाहेर पडलीये.
बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेला सुरूवात झाली असून नुकताच पायल मलिक हिने मोठे भाष्य केले. पायल मलिक म्हणाली की, घटस्फोट घेण्याचा निर्णय तिचा नक्कीच चुकीचा होता…
‘बिग बॉस ओटीटी 3’च्या फिनालेमध्ये परत एकदा अरमान मलिक आणि विशाल पांडे हे समोरासमोर आल्याचे बघायला मिळतंय.
बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेला सुरूवात झालीये. यावेळी रणवीर शाैरीचा लूक पाहून लोकांना मोठा धक्का बसलाय. रणवीर शाैरी यांनी पूर्ण दाढी काढल्याचे दिसत आहे.
बिग बॉस ओटीटी 3 सुरू झाले असून अनिल कपूर यांनी शोला सुरूवात केलीये. यावेळी अनिल कपूर हे घरातील सदस्यांना बोलताना दिसत आहेत.
बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेला सुरूवात झालीये.
फिनालेपूर्वी निर्मात्यांनी शोचा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हे अनिल कपूरसोबत डान्स करताना दिसत आहेत. श्रद्धा कपूर ही बिग बॉस ओटीटीच्या फिनालेमध्ये धमाल करताना दिसणार आहे.
बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले लाईव्ह आपल्याला जियो सिनेमावर बघता येईल. रात्री नऊ वाजता फिनालेला सुरूवात होईल.
रणवीर शौरी हे बिग बॉस ओटीटी 3 चे विजेता होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
अनिल कपूर हे पहिल्यांदाच बिग बॉसला होस्ट करताना दिसले.
रणवीर शौरी आणि सना मकबूल यांच्यामध्ये काटे की टक्कर बघायला मिळतंय. दोघांपैकी एकजण बिग बॉस ओटीटीचा विजेता होणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेला रात्री नऊ वाजता सुरूवात होणार आहे. फिनालेमध्ये धमाका करण्यासाठी अनेक मोठे कलाकार पोहचणार आहेत.
कृतिका मलिक, रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजी हे बिग बॉस ओटीटी 3 चे टॉप फायनलिस्ट आहेत. यापैकी एकजण बिग बॉस ओटीटी 3 चा विजेता असणार आहे.