Bigg Boss 3 OTT winner : सना मकबूल हिच्या डोक्यावर ‘बिग बॉस ओटीटी 3’चा ताज…

| Updated on: Aug 03, 2024 | 12:01 AM

Bigg Boss 3 OTT winner Prize Money : बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे अनेक रेकॉर्ड या सीजनने तोडले आहेत. अखेर बिग बॉस ओटीटी 3 ला त्याचा विजेता मिळाला आहे. सुरूवातीपासूनच विजेता कोण होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली.

Bigg Boss 3 OTT winner : सना मकबूल हिच्या डोक्यावर बिग बॉस ओटीटी 3चा ताज...
Sana Makbul
Follow us on

बिग बॉस ओटीटी 3 ला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. आज बिग बॉस ओटीटी 3 चे फिनाले नुकताच पार पडलाय. विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटी 3 ला त्याचा विजेता देखील मिळालाय. कृतिका मलिक, रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजी हे टॉप 5 मध्ये पोहोचले. या पाच जणांमध्ये काटे की टक्कर देखील बघायला मिलाळी. फिनालेमध्ये धमाका करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अनिल कपूर हे बिग बॉसला होस्ट करताना दिसले. या सीजनला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद हा नक्कीच मिळालाय. बिग बॉस ओटीटी 3 हे हिट नक्कीच ठरले आहे.

अखेर बिग बॉस ओटीटी 3 चा ताज सना मकबूलला मिळाला आहे. शेवटी अनिल कपूर यांनी बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा केलीये. सुरूवातीपासूनच बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना सना मकबूल दिसली. विशेष म्हणजे सना मकबूल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग देखील बघायला मिळते.

सुरूवातीपासूनच सांगितले जात होते की, सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता होईल. बिग बॉस ओटीटी 3 चा विजेता कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आज अनिल कपूर यांनी नावाची घोषणा केलीये. सना मकबूलला 25 लाख रूपये बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांकडून देण्यात आले. यासोबत विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसतोय.


अनेक चर्चेत असलेली नावे यंदाच्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. सुरूवातीला अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींवर बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली. फक्त त्यांच्यावरच नाही तर अनेकांनी निर्मात्यांना देखील टार्गेट केल्याचे बघायला मिलाले.

दरवर्षी बिग बॉस ओटीटीला करण जोहर हा होस्ट करताना दिसतो. मात्र, पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटीला होस्ट करताना अनिल कपूर हे दिसले. विशेष म्हणजे अनिल कपूर यांना होस्ट करताना पाहून अनेकांना थेट सलमान खान याचीच आठवण आली. अशी देखील एक चर्चा सुरू आहे की, अनिल कपूर हेच पुढील अनेक सीजनला होस्ट करताना दिसतील.