मुंबई | 10 मार्च 2024 : ‘बिग बॉस 7’ फेम अभिनेत्री सोफिया हयात हिच्यासोबत दुबईत मोठी धक्कादायक घटना घडली आहे. रिपोर्टनुसार, सोफिया बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी दुबईत पोहोचली होती. पण अभिनेत्रीला अटक करण्यात आली. सोफियाचा दावा आहे की, तिला 31 डिसेंबर 2023 रोजी विमानतळावर अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आलं. सोफियाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेली घटना सर्वांना सांगितली आहे.
अभिनेत्री बॉयफ्रेंड मुबारक आइसा मुबारक मोहम्मद अल मेराखी याला भेटण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी दुबईला गेली होती. मात्र तेथे पोहोचताच सोफियाला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोफिया हयात हिची चर्चा रंगली आहे.
सोफिया म्हणाली, ’31 डिसेंबर 2023 रोजी अल उल्ला जात असताना मला अटक करण्यात आली. ही घटना अचानक घडली. मला विमानतळावरच अटक करण्यात येईल याचा मी विचार देखील केला नव्हता. मी ब्रिटीश दुतावासाला फोन करण्यासाठी सांगितलं. पण त्यांनी तसं केलं नाही. मला अटक का करत आहात… असा प्रश्न मी जेव्हा पोलिसांना विचारला, तेव्हा त्यांनी मला शांत राहण्यासाठी सांगितलं.’
‘मला ज्याठिकाणी ठेवण्यात आलं होते तेथे कोणीच नव्हतं. मला आजारी पडल्यासारखं देखील वाटत होतं. म्हणून छोट्या खिडकीतून आवाज दिला. पण कोणीच आलं नाही. एका तासानंतर अधिकारी आले आणि मला औषधं देऊ लागले. पण मला मी औषधं घेतली नाहीत, कारण मला माहिती नव्हतं ते काय आहे.’
‘6 तास तुरुंगात राहिल्यानंतर, एका महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत मला पिंजऱ्या सारख्या बंद पोलीस व्हॅनमध्ये दुबई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तेथे पोहोचण्यासाठी जवळपास 25 मिनिटं लागली. मी प्रचंड घाबरली होती. माझ्यासोबत असलेले अधिकार टिकटॉकवर बॉलिवूड व्हिडीओ पाहात होते.’
‘जेव्हा दुबई पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, तेव्हा मला एका खोलीत नेण्यात आलं. जेथे 4 अधिकारी माझ्यावर ओरडले आणि म्हणाले £5000 (भारतीय करंसीनुसार जवळपास 5 लाख 32 हजार रुपये) एक व्यक्तीकडून बळजबरी करुन घेत आहेस आणि सेक्स व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी एका व्यक्तीला देत आहेस..’
‘पोलिसांचे आरोप ऐकून मला मोठा धक्का बसला. मी मोठमोठ्याने रडू लागली. माझ्या एक्स बॉयफ्रेंडने माझ्याकडून सुमारे 5 लाख 32 हजार रुपये घेतले होते आणि ते पैसे त्याला मला परत करायचे होते. तो पोलिसांसोबत खोट बोलला कारण त्याला माझे पैसे द्यायचे नव्हते…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पोलिसांनी माझ्या मोबाईलची चौकशी केली. त्यांना एक मेसेज सापडला. जो मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला केला होता, मेसेजमध्ये लिहिलं होतं, ‘तू मला माझे पैसे दिले नाहीस तर, मी सोशल मीडियावर तुझं पितळ उघडं करेल. जगाला सांगेल तू काय केलं आहेस… असं करणं दुबईत गुन्हा आहे. ज्यासाठी 2 वर्षांचा तुरुंवास किंवा £50,000 दंड होऊ शकतो..
‘मेसेज वाचल्यानंतर पोलिसांना कळलं यामध्ये माझी काहीही चूक नाही. याच आधारावर त्यांनी मला सोडलं. नाहीतर मी आता तुरुंगात असती. मी त्याच्यासोबत दुबईत लग्न करण्यासाठी गेली होती. पण मला तुरुंगात जावं लागलं. 2 महिने मला तुरुंगात ठेवण्यात आलं. माझा फोन जप्त करण्यात आला. पोलिसांना माहिती होतं मला कधी बाहेर काढणार आहेत…’
एक्स बॉयफ्रेंडबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘लंडनमध्ये जेव्हा तो उपचारासाठी आला होता. तेव्हा त्यांची भेट झाली. त्याने मला लग्नासाठी मागणी घातली आणि म्हणाला लग्नानंतर दुबईत स्वतःचा व्यवसाय सुरु करु. ठरवल्याप्रमाणे काही झालंच नाही, पण तुरुंगात जावं लागलं. मला औषधांची गरज होती, पण दुबईत ती ओषधं उपलब्ध नव्हती… तरी देखील मला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती…’