‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री टिना दत्ता हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीने एग फ्रिजिंग आणि सरोगेसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अभिनेत्रीने लग्नाबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. लग्नाबद्दल टिना म्हणाली, माझं लग्न व्हावं अशी माझअया वडिलांची इच्छा आहे. पण लग्न नाही झालं तर, सरोगेसीच्या माध्यमातून बाळाचं जगात स्वागत करायचं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त टिना दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री टिना दत्ता एग फ्रिझिंगबद्दल म्हणाली, ‘एग फ्रिझिंग या पर्यायाचं मी समर्थन करते. माझ्या जवळच्या मित्राने मला एग फ्रिझिंगचा सल्ला दिला आहे. मला असं वाटतं मुली 20 व्या दशकातील आहेत, तर त्यांनी एग फ्रिझ करायला हवेत. कारण हे वय योग्य वय आहे. वयाच्या 35 व्या वर्षानंतर अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्रत्येक मुलीने एग फ्रिझ केले पाहिजे. एग फ्रिझ करणं हा एक सामाजिक बदल आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सांगायचं झालं तर, आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांचं एग फ्रिझ केले आहेत.
टिना दत्ता हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘उतरन’ मालिकेमुळे टिना हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील अभिनेत्रीने भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. टिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
टिना दत्ता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. टिना तिच्या क्यूटनेसमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर टिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.