मुंबई : ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमधील स्पर्धक कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरातून प्रसिद्धीझोतात आलेले सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस’ सीझन ७ मधील एक डायलॉग चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. अभिनेता एजाज खान याचा ‘एक नंबर…’ हा डायलॉग तुफान चर्चेत होता. एजाज याला अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस’ शोमधून ओळख मिळाली. पण प्रसिद्धीझोतात आल्यानंतर एका गंभीर प्रकरणामुळे अभिनेत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली… २०२१ मध्ये ड्रग्स प्रकरणात एजाज खान याला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एजाजला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं होतं. अभिनेत्याजवळ अल्प्राझोलम नावाच्या औषधांच्या ३१ गोळ्या सापडल्या.
एजाज खान याच्याकडे सापडलेल्या गोळ्याचं वजन ४.५ ग्रॉम होतं.. त्यानंतर अभिनेत्याला पोलिसांनी विमानतळावरून अटक केलं. गेल्या दोन वर्षांपासून एजाज खान मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात कैद होता. एजाज खानवर एनसीबीने ड्रग्ज तस्कर शादाब बटाटा यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याला अटकही करण्यात आली होती.
कोर्टात एजाजवर आरोप करताना असेही सांगण्यात आले की, तो फक्त ड्रग्जच खरेदी करत नाही तर त्याचे सेवनही करतो. पण अखेर दोन वर्षांनंतर अभिनेत्याला दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्यांचे कुटुंबिय त्याच्या जामिनासाठी लढत होते आणि याचिका दाखल करत होते. अशात २०२२ मध्ये मुंबई हाय कोर्टाने अभिनेत्याच्या जामिनासाठी स्पष्ट नकार दिला होता.
महत्त्वाचं म्हणजे, एजाज याच्याकडे ड्रग्स दिल्याचे पैसे असल्याचं देखील तपासात समोर आलं.. पण आता दोन वर्षांनंतर अभिनेत्याला ड्रग्स प्रकरणी दिलासा मिळाला आहे. दोन वर्षांनंतर अभिनेता घरी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी संध्याकाळी ६.४० वाजता एजाज खान याची सुटका होणार आहे…
अभिनेत्याला तुरुंगातून घरी घेवून जाण्यासाठी एजाजचं कुटुंब देखील उपस्थित राहणार आहे. एजाज याच्या सुटकेसाठी गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबियांची धडपड सुरू होती. आता दोन वर्षांनंतर अभिनेता घरी येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एजाज खान याची चर्चा आहे.