अभिनेता सलमान खान स्टारर ‘बिग बॉस 18’ शोला सुरुवात झाली आहे. शोमधील एक स्पर्धक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता करणवीर मेहरा आहे. करणवीर याने दोन लग्न केलीत, पण अभिनेत्याचे दोन्ही लग्न अपयशी ठरली. शोमधील स्पर्धक आणि लाईफ कोच अफरीन खान, करणवीर याच्यावर बोलताना दिसले. घरातील इतर स्पर्धकांपैकी करणवीर अधिक रागीट आणि हिंसक आहे. असं अफरीन म्हणाले.
दरम्यान, करणवीर तुम्हाला रागीट आणि हिंसक का वाटतो? असा प्रश्न होस्ट सलमान खान याने अफरीन याला विचारला. यावर अफरीन म्हणाले, ‘करणवीर याने आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. त्याचं दोनदा घटस्फोट देखील झालं आहे.’ यावर करणवीर याने देखील उत्तर दिलं.
करणवीर म्हणाला, ‘माझे दोन लग्न झाले आहेत. दोघींसोबत घटस्फोट देखील झाला आहे. पण मी कधीच दोघींना मारहाण केली नाही. अनेकदा आमच्यात वाद झाले. पण मी कधीच माझ्या दोन्हा बायकांसोबत हिंसक व्यवहार केला नाही…’, सध्या सर्वत्र करणवीर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
करणवीर याचं पहिलं लग्न 2009 मध्ये मैत्रिण देविका हिच्यासोबत झालं होतं. देविका हिला 10 वर्ष डेट केल्यानंतर करणवीर याने लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या 8 वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये करणवीर आणि देविका यांचा घटस्फोट झाला.
पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर करणवीर याने 2021 मध्ये दुसरं लग्न अभिनेत्री निधी सेठ हिच्यासोबत केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. निधी हिने करणवीर मेहरा सोबत लग्न करणं चुकीचा निर्णय होता… असं सांगितलं. अशात दोघांचे 2023 मध्ये मार्ग वेगळे झाले. आता अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे.