Bigg Boss नंतर कोट्यवधी रुपयांचा मालक झालेल्या एमसी स्टॅन याने पाहिल्या अनेक धक्कादायक गोष्टी

| Updated on: Feb 26, 2023 | 5:13 PM

Bigg Boss फेम एमसी स्टॅन म्हणतो, 'सर्वांसमोर रक्तपात, शाळेत पाहिलेला हाफ मर्डर...' आयुष्यात अनेक चढ - उतार पाहिलेल्या रॅपरला अभिनेता सलमान खान याने दिली मोलाचा सल्ला

Bigg Boss नंतर कोट्यवधी रुपयांचा मालक झालेल्या एमसी स्टॅन याने पाहिल्या अनेक धक्कादायक गोष्टी
Follow us on

Bigg Boss fame Mc stan : ‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्रसिद्धीमध्ये अभिनेत्याने शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यापासून विराट कोहली (Virat Kohli) याला देखील मागे टाकलं आहे. आज अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत फिरणार एमसी स्टॅन एकेकाळी फार हालाखीच्या परिस्थितीत राहिला आहे. एनसी स्टॅन याने लहानपणीच फार धक्कादायक गोष्टी स्वतःच्या आयुष्यात पाहिल्या. वाईट लोकांची संगत आणि आर्थिक परिस्थितीमुळे एमसी स्टॅन याचं लहानपण मोठ्या कष्टात गेलं. लहानपणी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टी रॅपरने एका मुलाखतीत स्पष्ट सांगितल्या.

मुलाखतीत एमसी स्टॅन म्हणाला, ज्या ठिकाणी रॅपर रहायचा, ती वस्ती फार खराब होती. वस्तीमध्ये सतत रक्तपात होत असे. वस्तीमधील लोक एका ठिकाणी उभे रहायचे, वस्तीतील ही गोष्ट इतर लोकांना अजब वाटयची. पण वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं घर फार लहान होतं. इतकं लहान की, तीन लोकांपेक्षा जास्त जण घरात राहू शकत नव्हते. त्यामुळे एमसी स्टॅन देखील अधिक वेळ वस्तीमध्ये इतर मुलांसोबत असायचा.

हे सुद्धा वाचा

 

 

एवढंच नाही तर, एमसी स्टॅन याने शाळेतील एक धक्कादायक किस्सा देखील सांगितला. तेव्हा एमसी स्टॅन फार लहान होता. तो कोणत्या शाळेत शिकायचा हे देखील त्याच्या आई – वडिलांना माहिती नव्हतं. एक दिवस शाळेत एक घटना मर्डरपर्यंत येवून पोहोचली. तेव्हा एमसी स्टॅन याच्या आई – वडिलांनी त्याला शाळेतून काढलं आणि दुसऱ्या शाळेत घातलं.

वाईट लोकांची संगत असल्यामुळे एमसी स्टॅन याने देखील वाईट कामे करण्यास सुरुवात केली होती. स्टेशनवर उभं राहून लोकांच्या हातून फोन ओढणं… यांसारखी कामे एमसी स्टॅन याने करण्यास सुरुवात केली. आपण करत असलेली कामे वाईट असल्याचं कळताच एमसी स्टॅनने वाईट मार्ग सोडला. एमसी स्टॅन म्हणाला, प्रत्येकाला पैशांची गरज होती. दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे आणि पैशांची चणचण असल्यामुळे वस्तीतील लोक वाईट काम करायचे.

सलमान खान याने दिलेले एक सल्ला देखील एमसी स्टॅन याने मुलाखतीत सांगितला. ‘ऑफस्क्रिन जेव्हा सलमान खान याला भेटलो, तेव्हा त्याने अनेक गोष्टी सांगितल्या. एखाद्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे त्याने माझी समज घातली. शिवाय आई – वडिलांसाठी आता नवीन घर घेण्यासाठी देखील सलमान खान याने मला सांगितलं… ‘बिग बॉस १६’ शोचा विजयी ठरल्यापासून एमसी स्टॅन तुफान चर्चेत आहे.