मुंबई : टीव्ही अभिनेता शालीन भनोट (Shalin Bhanot) कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ मध्ये शालीन याने प्रवेश केला आणि पुन्हा चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. पण शालीन बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरु शकला नाही. बिग बॉसच्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेक वाद झाले. शालीन यांची पहिली पत्नी आणि अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) हिने शालीनवर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले होते. लग्नानंतर ६ वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दलजीत हिने घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी दुसरं लग्न करण्याचा विचार केला आहे.
पहिली पत्नी दुसर लग्न करत असल्यामुळे शालीन याने दलजीत हिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दलजीत हिला शुभेच्छा देत शालीन म्हणाला, ‘मी तिच्यासाठी उत्तम आयुष्याची प्रार्थना करतो. तिच्या आयुष्यात भरपूर प्रेम राहवं यासाठी मी शुभेच्छा करतो. मी तिच्या नव्या आयुष्यासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी आनंदी आहे…’ असं अभिनेता म्हणाला.
शालीन आणि दलजीत यांच्यात ‘कुलवधू’मालिकेच्या सेटवर प्रेम बहरलं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २००९ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ६ वर्षांनंतर शालीन भनोट यांच्या पहिल्या पत्नीने अभिनेत्यावर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले. अखेर २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर दलजीत दुसरं लग्न करून मुलासोबत परेशात शिफ्ट होणार आहे. शालीन याचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (dalljiet kaur) हिच्यासोबत केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या ६ वर्षांनंतर दलजीत आणि शालीन यांनी घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर दलजीत मार्च महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहे. लग्नानंतर दलजीत कौर तिच्या आणि शालीनचा मुलगा जेडन याला देखील यूकेमध्ये घेवून जाणार आहे. दलजीत हिच्या होणाऱ्या पतीचं नाव निखिल पटेल (nikhil patel) असं आहे.
दलजीद आणि निखिल पटेल १८ मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. दलजीद हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नव्या आयुष्याला लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली. आता लवकरच शालीन याची पहिली पत्नी दुसरं लग्न करणार आहे.
दलजीत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.