मुंबई : अभिनेता शालिन भनोट ‘बिग बॉस १६’ मुळे सध्या तुफान चर्चेत आहे. शालिन बिग बॉसमधील दमदार स्पर्धकांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात शालिन अभिनेता टीना दत्तासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी टीनाने शालिन याला रागीट असं म्हटलं होतं. दरम्यान बिग बॉसच्या घरात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शालिन खऱ्या आयुष्यात प्रचंड रॉयल आयुष्य जगतो. कायम आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा शालिन कोट्यवधींचा मालक आहे.
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शालिन दोन कंपन्यांचा मालक आहे. शालिन फक्त अभिनयाच्या माध्यमातून नाही तर, त्यात्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. शालिन प्राइम लँड प्रायव्हेट लिमिटेड आणि भनोट क्रिएशंस प्रायव्हेट लिमिटेड अशी शालिनच्या दोन कंपन्यांची नावे आहेत.
सध्या शालिन त्यांच्य संपत्तीमुळे चर्चेत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा शालिन त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चे आला. शालिनचं घटस्फोट झालं आहे. टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिच्यासोबत शालिनचं लग्न झालं होतं. शालिन आणि दलजीत यांना एक मुलगा आहे.
घटस्फोटानंतर दलजीत मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दलजीत हिने शालिन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा असल्याचं अभिनेत्यावर सांगत घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. लग्नाच्या ६ वर्षांनंतर दलजीत आणि शालिन विभक्त झाले.
दोघांनी नातं टीकावं म्हणून एकमेकांना संधी देखील दिली. दोघांनी ‘नच बलिए 4’ शोमध्ये भन्नाट डान्स करुन विजय देखील आपल्या नावावर केला. ज्यामुळे दोघांचं प्रचंड कौतुक झालं. पण शालिन आणि दलजीत यांचं नातं टिकलं नाही. अखेर २०१५ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.