Ganesh Chaturthi | शिव ठाकरेच्या घरी पोलिसांच्या वर्दीतील बाप्पाचं आगमन

| Updated on: Sep 19, 2023 | 9:55 AM

बिग बॉस आणि खतरों के खिलाडी फेम अभिनेता शिव ठाकरेच्या घरी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. शिव ठाकरेच्या घरी यंदा पोलिसांच्या वर्दीतील अनोख्या बाप्पाचं आगमन झालं आहे.

1 / 5
गणेश चतुर्थीनिमित्त ढोलताशाच्या गजरात, धूमधडाक्यात लाडक्या गणरायाचं आगमन केलं जातंय. बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. शिव ठाकरेनं पोलिसांच्या वर्दीतील गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणली आहे.

2 / 5
गणपतीच्या आगमनाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये पोलिसांच्या वर्दीतील बाप्पाची अनोखी मूर्ती पहायला मिळतेय. अनेकांना बाप्पाचा हा अवतार खूप आवडला. मात्र काहींना तो खटकला. यावरून काही नेटकऱ्यांनी शिव ठाकरेला ट्रोल केलं आहे.

3 / 5
गणपतीच्या मूर्तीला पोलिसांची वर्दी घालणं काहींना पसंत पडलं नाही. 'देवाची मस्करी करू नये', असं एकाने म्हटलंय. तर 'हे योग्य नाही. देवाला त्यांच्या वास्तविक रुपातच राहू द्यावं', असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

4 / 5
दरवर्षी गणेश चतुर्थीला शिव ठाकरेच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन केलं जातं. पोलीस सर्वसामान्य नागरिकांचं रक्षण करतात. सणासुदीलाही ते कुटुंबीयांसोबत न राहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात. म्हणूनच त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी शिव ठाकरेनं यंदा बाप्पा पोलिसाच्या रुपात आणला आहे.

5 / 5
यावेळी शिव ठाकरेसोबत पोलिसांनीही मिळून बाप्पाचं आनंदाने स्वागत केलं. ढोलताशाच्या गजरात पोलिसांच्या वर्दीतील या खास बाप्पाचं आगमन झालं.